नाविन्य प्रकाशन आणि महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र साहित्य परिषद मावळ शाखा आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन.
तळेगाव दाभाडे :
नाविन्य प्रकाशन आणि महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने*महाराष्ट्र साहित्य परिषद मावळ शाखा आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळा हा पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. सुरेश साखवळकर (संपादक साप्ताहिक अंबर) हे असणार आहेत.
तसेच या कार्यक्रमालाप्रमुख पाहुणे म्हणून राजन लाखे (कवी व साहित्यिक) आणि संग्राम जगताप (बांधकाम व्यवसायिक) तसेच श्री. नितीन खैरे (नाविन्य प्रकाशन, पुणे) हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमाचे स्थळ ड्रीम लंच बॉक्स रेस्टॉरंट, नाना भालेराव कॉलनी, सेवाधाम ग्रंथालयासमोर, तळेगाव स्टेशन येथे हा कार्यक्रम होणार आहे.या कार्यक्रमात श्रीकृष्ण पुरंदरे लिखित आनंदी आनंद** (लहान मुलांसाठी काव्यसंग्रह) आणि पद्यरेघा (काव्यसंग्रह) तसेच ओंकार वर्तले लिखित एक झुंज वाघाशी (कादंबरी) प्रकाशित होणार आहे.
दिनांक3 ऑगस्ट 2024, संध्याकाळी 5 वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे.साहित्यप्रेमी मंडळींनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहावे, ही नम्र विनंती या कार्यक्रमाचे संयोजक
महाराष्ट्र साहित्य परिषद मावळ शाखा आणि कार्यकारिणी सदस्य यांच्यातर्फे आपणा सर्वांना करण्यात आली आहे.