*ध्येय प्राप्तीसाठी भावनेपेक्षा कर्तव्य महत्वाचे!*..*डॉ.प्रमोद बोराडे*
तळेगाव दाभाडे :
*रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी व अश्विनी डेंटल क्लिनिक यांचे संयुक्त विद्यमाने रोटरी सिटीचे मेडिकल डायरेक्टर रो.डॉ. सौरभ मेहता यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तळेगाव नगर परिषदेच्या थोर समाजसेवक नथूभाऊ भेगडे पाटील शाळेतील ५०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य समारंभपूर्वक वाटप करण्यात आले व शिवराज्याभिषेक ३५० वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त इतिहास संशोधक डॉ.प्रमोद बोराडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याची माहिती विशद केली.ध्येय प्राप्त करण्यासाठी भावनेपेक्षा कर्तव्य महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन डॉक्टर प्रमोद बोराडे यांनी करताना अनेक प्रसंग विद्यार्थ्यांना सांगितले.*
*सदर प्रसंगी डॉ.सौरभ मेहता यांचा अभिष्टचिंतन सोहळा रोटरी सिटी क्लबच्या वतीने करण्यात आला सत्काराला उत्तर देताना आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे काही देणे देणे लागतो या भावनेतून प्रत्येकाने मदत करावी व विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन खूप मोठे व्हावे व एक दिवस त्यांनी सुद्धा समाजाला मदत करावी असे प्रतिपादन डॉ.सौरभ मेहता यांनी केले व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. क्लब एडमिन संतोष परदेशी यांनी सौरभ मेहता यांचा परिचय करून दिला तर मेंबरशिप डायरेक्टर प्रशांत ताये यांनी डॉ.प्रमोद बोराडे यांचा परिचय करून दिला. शाळेच्या मुख्याध्यापिका मिरगे मॅडम व डिस्ट्रिक्ट ३१३१ चे उपप्रांतपाल दीपक फल्ले यांनी शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केले.*
*सर्व उपस्थितांचे स्वागत प्रकल्प प्रमुख बसप्पा भंडारी यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेक्रेटरी सुरेश दाभाडे यांनी केले सूत्रसंचालन उपाध्यक्ष भगवान शिंदे यांनी तर पर्यावरण डायरेक्टर प्रदीप टेकवडे यांनी आभार मानले.*
*रोटरी सिटीचेअध्यक्ष रो.किरण ओसवाल यांच्या मार्गदर्शनानुसार रोटरी पदाधिकारी व सदस्य यांनी कार्यक्रमाचे सुंदर नियोजन केले. क्लब ट्रेनर दिलीप पारेख, माजी अध्यक्ष सुरेश शेंडे, रो.प्रदीप मुंगसे,रो.विश्वास कदम,रो. नितीन शहा,शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक,सतीश मेहता व कुटुंबीय समारंभास उपस्थित होते.*