साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी..
कोंढवा पुणे :
वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या वतीने गुरुवार दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्य तिथीनिमित्त तसेच लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जालींदर कामठे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी विविध विद्यार्थ्यांची भाषणे झाली विद्यार्थ्यांना लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा इतिहास कळावा यासाठी संस्थेच्या वतीने विविध कथा, कादंबरी यांचे वाटप करण्यात आले.
सदर प्रसंगी बोलताना जालींदर कामठे यांनी सांगितले की भारतीय स्वांतत्र्य लढ्यातील क्रांतीकारकांना ऊर्जा देणारा झंझावात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक होते तसेच कष्टकरी, श्रमिक, वंचित आणि शोषितांचा आवाज बुलंद करणारे थोर समाजसुधारक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी गोरगरिब, दिन दलित, शोषित, वंचित, शेतकरी, यांच्यासाठी आपले जीवन अर्पण केले अशा महान साहित्यकार, समाजसेवक यांना विनम्र अभिवादन करण्यात आले .
सदर प्रसंगी प्राचार्य भानुदास रिठे, हेमंत जाधव, संभाजी साबळे, विकास मोरे, सुरेखा कोलते, स्वाती डहाळे, सुनीता जाधव, इत्यादी उपस्थित होते.