विश्वासाच्या प्रवासाला ३५ वर्षांची सुवर्ण किनार: श्री डोळसनाथ पतसंस्थेच्या वर्धापनदिनाचे आयोजन
तळेगाव दाभाडे :श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित या विश्वासार्ह आर्थिक संस्थेचा ३५ वा वर्धापनदिन बुधवार, दिनांक २० मे २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होत आहे. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ सर्वसामान्य ग्राहक, सभासद आणि व्यापारी वर्गाच्या आर्थिक उन्नतीसाठी कार्यरत असलेल्या संस्थेने आपल्या सेवाभिमुख कार्यातून वेगळी ओळख निर्माण केली आहे.
वर्धापनदिनानिमित्त संस्थेत सत्यनारायण महापूजा तसेच ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ४ ते ६ या वेळेत होणाऱ्या ग्राहक मेळाव्यात सभासद, ठेवीदार, ग्राहक आणि हितचिंतक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली. आर्थिक व्यवहारातील पारदर्शकता, विश्वासार्ह सेवा आणि ग्राहकाभिमुख उपक्रम यामुळे संस्थेने ग्रामीण व शहरी भागात भक्कम विश्वास संपादन केला आहे.
हा कार्यक्रम संस्थेच्या मुख्य कार्यालयात, पारेख रेसिडेन्सी, पंचवटी कॉलनी, तळेगाव दाभाडे येथे आयोजित करण्यात आला आहे. संस्थेच्या तळेगाव दाभाडे, देहू, सोमाटणे आणि कामशेत शाखांमधील ग्राहकांनाही उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






