धर्मवीर संभाजी नागरी सह. पतसंस्थेचा रौप्य महोत्सवानिमित्त १०% लाभांश जाहिर
तळेगाव दाभाडे :
धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेची २५ वी रौप्य महोत्सवी वार्षिक सर्वसाधारण सभा दि. २८/०७/२४ रोजी सुशिला मंगल कार्यालय येथे नुकतीच पार पडली असून, या सभेचे उद्घाटन सरदार सत्यशीलराजे दाभाडे (सरकार) व संस्थापक मा. श्री. खंडूजी टकले यांच्या हस्ते करण्यात आले, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मावळचे आमदार मा. श्री. सुनिल शेळके व मा. नगराध्यक्ष सुरेश धोत्रे व भाजपा मावळ तालुका महिला अध्यक्षा सौ. सायली बोत्रे उपस्थित होते व सभेच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. विनोद टकले होते. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये पतसंस्थेकडे १६ कोटीच्या ठेवी असुन, कर्जवाटप १३ कोटी ६१ लाख आहे. तसेच पतसंस्थेची या वर्षी वार्षिक उलाढाल ७३ कोटी झाली आहे, पतसंस्थेस रु. ८१ लाख ३६ हजार नफा झाला असुन, सभासदांना १०% लाभांश जाहिर केला आहे. या सभेत शिवव्याखाते मा.प्रा. नामदेवराव जाधव यांनी २१ व्या शतकातील उद्योजकता या विषयावर व्याख्यान सादर केले. या सभेमध्ये सर्व प्रमुख पाहुण्यांनी आपापले विचार मांडले. व पतसंस्थेच्या अद्यावत कामकाजाबाबत कौतुकही केले. पतसंस्थेच्या या सभेत दै. बचत प्रतिनिधी समाधान शिंदे, प्रविण वडनेरे, शैलेश वहिले व दत्ता भेगडे यांचा सर्वाधिक रक्कम जमा केल्याबद्दल व कर्जवाटप केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. सचिव संजय शिंदे यांनी अहवाल वाचन केले, उपाध्यक्ष जितेंद्र बोत्रे यांनी सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक केले संचालक विजय शेटे यांनी आभार मानले. कार्यक्रम स्थळी संचालक संतोष परदेशी यांची खजिनदार पदी नेमणुक करण्यात आली. कार्यक्रमांचे सुत्रसंचालन शितल शेटे व व्यवस्थापिका सुनिता शेंडे यांनी केले. तसेच तळेगाव मधिल मा. सर्व पत्रकार साहेब, सभासद, ठेवीदार व हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते. पतसंस्थेने रौप्य महोत्सवानिमित्त प्रत्येक सभासदांकरिता भेटवस्तु व लकी ड्रॉ ठेवण्यात आला होता. तसेच हि सभा यशस्वी करण्याकरिता संचालक दत्तात्रय पिंजण, दत्तात्रय शिंदे, केशव कुल, व निमंत्रित संचालक मंडळ उपस्थित होते व कर्मचारी वर्ग व दै. बचत प्रतिनिधी यांचे बहुमुल्य सहकार्य लाभले.