स्पार्कल वर्ल्ड ग्लोबल फाऊंडेशन, पुणे यांच्या अर्थ साक्षर भारत अभियान या मोहीमे अंतर्गत नूतन कॉलेज ऑफ इंजीनीरिंग अँड रिसर्च, तळेगाव दाभाडे, पुणे या ठिकाणी आर्थिक साक्षरतेचा कार्यक्रम पार पडला.
तळेगाव दाभाडे :
स्पार्कल वर्ल्ड ग्लोबल फाऊंडेशन, पुणे यांच्या अर्थ साक्षर भारत अभियान या मोहीमे अंतर्गत नूतन कॉलेज ऑफ इंजीनीरिंग अँड रिसर्च, तळेगाव दाभाडे, पुणे या ठिकाणी आर्थिक साक्षरतेचा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमात स्पार्कल वर्ल्ड ग्लोबल फाऊंडेशन चे संस्थापक संचालक श्री राहुल माने आणि सौ रीमा राहुल माने, सभासद अतुल साबळे, संगीत जोंधळे, साहिल आमले, अश्लोका सोनवणे, सागर जाधव श्रीनिवास घोडके, नीरज शिंदे, अनिल मांदळे, गौतम पाटेकर, उत्कर्ष निकम आणि प्रशांत पाटील उपस्थित होते.तसेच नूतन कॉलेजच्या वतीने कॉलेजच्या प्राचार्य डॉ अपर्णा पांडे, ईएनटीसी चे एचओडी आर.के भेगडे, प्राध्यापक अमोल सोनवणे आणि इतर शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते.
कॉलेजच्या वतीने आलेल्या पाहुण्यांचे सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. स्पार्कल वर्ल्ड ग्लोबल फाऊंडेशन च्या वतीने भारत मातेची मूर्ती संस्थेला भेट देण्यात आली. भारत मातेची आरती करून अतिशय प्रसन्न वातावरणात कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमात बोलताना सौ रीमा माने म्हणाल्या की विद्यार्थ्यांनी फक्त छोटया पदाच्या नोकरीची स्वप्ने न बघता आपणही कसे मोठ्या पदावर काम करू शकतो, जसे सीईओ, सीएफओ, सीआयओ, एफएसडी सीआरओ अशा विविध उच्च पदांवर विराजमान होण्याचे स्वप्न आतापासूनच उराशी बाळगले पाहिजे. त्यासाठी लागणारी तयारी आणि मेहनत आत्तापासून घेणे गरजेचे आहे.
कार्यक्रमात बोलताना राहुल माने म्हणाले की आपले स्वप्न कमी वयात पूर्ण करण्यासाठी नोकरीच्या सुरुवातीपासूनच बचत आणि योग्य गुंतवणूक यांची सवय अंगीकारली पाहिजे. यासाठी आर्थिक साक्षरता गरजेचे आहे. आर्थिक साक्षरतेचे योग्य ज्ञान घेऊन भारतीय शेअरबाजार याचा सखोल अभ्यास करून योग्य गुंतवणूक केल्यास आपली भविष्यातील स्वप्न फार कमी वयात पूर्ण होऊ शकतात . आजकालच्या आधुनिक युगात मोबाइल, सोशल मीडिया आणि इंटरनेट यांच्या अतिवापरामुळे विद्यार्थी तणावग्रस्त आहेत. आई वडील, शिक्षक व वडिलधाऱ्यां बद्दलचा आदर कमी होत चालला आहे आणि भारतमातेविषयी देशभक्तीची भावना कमी झाली आहे. त्यामुळे पैशा सोबत अध्यात्मिकतेचे ज्ञान वाढवले पाहिजे आणि भारत मातेसाठी काम करण्याची प्रवृत्ती विकसित झाली पाहिजे यासाठी मेडिटेशन चा कार्यक्रम घेण्यात आला.
बचत आणि गुंतवणूक ही काळाची गरज आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने तसेच शिक्षकाने शेअर बाजाराचे योग्य ज्ञान घेतले पाहिजे. तसेच शेअर बाजाराची चांगली आणि वाईट दोन्ही बाजूंचा विचार करून योग्य पद्धतीने गुंतवणूक करणे गरजेचे आहे असे प्राध्यापक आर के भेगडे म्हणाले.
आयुष्यात पैशासोबत आपली संस्कृती आणि वडिलधाऱ्यांचा आदर आणि भारतमातेविषयी देश प्रेम हे किती महत्त्वाचे आहे हे आजच्या कार्यक्रमातून आमच्या विद्यार्थ्यांना शिकायला मिळाले असे प्राध्यापिका लता मोरे म्हणाल्या.
आजच्या कार्यक्रमात शेअर बाजारसारखा अवघड विषय खूप सोप्या पद्धतीने मांडला त्याबद्दल प्राध्यापिका स्वाती नरुळे यांनी श्री. राहुल माने यांचे आभार मानले.
संस्थेच्या प्राचार्य डॉ अपर्णा पांडे म्हणाल्या, आजचा झालेला कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट आणि प्रेरणादायी होता आणि अशा प्रकारचे कार्यक्रम पुन्हा आमच्या कॉलेजमध्ये आयोजित करावेत यासाठी आमच्या कॉलेजकडून सर्व मदत आपल्या फाउंडेशनला मिळेल, असे आश्वासन दिले. भारत मातेची मूर्ती पाहून त्यांनी अतिशय आनंद आणि आभार व्यक्त केले.
स्पार्कल वर्ल्ड ग्लोबल फाऊंडेशन यांच्या अर्थसाक्षर भारत अभियान या मोहिमेअंतर्गत 1,00,000 महिलांना अर्थ साक्षर करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून आजचा कार्यक्रम नूतन कॉलेजमध्ये घेण्यात आला या कार्यक्रमात कॉलेजचे विद्यार्थी, शिक्षक वर्ग यांनी उत्स्फुत प्रतिसाद नोंदविला. स्पार्कल वर्ल्ड ग्लोबल फाऊंडेशन चे संस्थापक राहुल माने यांनी डॉ.अपर्णा पांडे आणि सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले.