राजधानी रायगड वरून आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचा तळेगाव दाभाडे मध्ये विसावा.

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

प्रतिवर्षी राजधानी रायगड ते पंढरपूर ते मावळ मार्गे शिवजन्मभूमी शिवनेरी असा मोठा प्रवास महाराजांच्या पालखीचा असतो. मावळ मध्ये इतिहास संशोधक डॉ. प्रमोद बोराडे यांच्या निवासस्थानी या पालखीचा विसावा होत असतो. या वर्षी वैराग्यमूर्ती डॉ. संदीप महिंद गुरुजी यांच्या मार्गदर्शनासहित आधी संजीवनी बालिकाश्रम, यशवंत नगर येथे व तद्नंतर डॉ. बोराडे यांच्या निवासस्थानी दोन्ही ठिकाणी महिंद गुरुजींचे प्रबोधन झाले. प्रबोधनाच्या नंतर शिवशाही परिवारने महाप्रसादाचे नियोजन केले होते. मावळ वासियांनी या पालखीला मोठ्या संख्येने सश्रद्ध निरोप दिला. कोविड मध्ये देखील हा पालखी सोहळा थांबला नव्हता हे उल्लेखनीय आहे.

Advertisement

शिवशाही दुर्गाभ्यास परिवार तर्फे पालखीचे सर्व नियोजन करण्यात आले होते. शिवशाही परिवारच्या सर्व सदस्यांनी तथा सभासदांनी हिरीरीने यात सहभाग घेऊन हा सोहळा यशस्वीरित्या पार पाडला.

शिवछत्रपतींच्या पादुका मस्तकावर घेऊन मावळातील अनेक मंडळीनी वेशीपर्यंत चालली. पुढील वर्षी बहुसंख्य मावळ्यांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे असे अवाहन सदर प्रसंगी शिवशाही परिवार तर्फे करण्यात आले…


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page