मुरबाड मध्ये आंतरराष्ट्रीय विराट संत संमेलन
मुरबाड :
मुरबाड तालुक्यातील श्री क्षेत्र संगमेश्वर येथे आंतरराष्ट्रीय विराट संत संमेलन व दर्शन आशिर्वचन महासन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. देशातील 111 तपस्वी साधु संत महंत अध्यात्मिक गुरूंची या संत संमेलनात उपस्थिती लाभणार असून भाविकांना दर्शन प्राप्ती होणार आहे. 9 डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता मुरबाड तालुक्यातील सरळगाव ते श्री क्षेत्र संगमेश्वर असा मिरवणूक सोहळा व महारथ यात्रा काढण्यात येणार आहे. सोमवार 9 ते 13 डिसेंबर असे पाच दिवस मुरबाड तालुक्यातील श्री क्षेत्र संगमेश्वर येथे हा कार्यक्रम सुरू राहणार आहे. विशेष कार्यक्रम हा 9 डिसेंबर रोजी पार पडेल पाच दिवस दररोज सायंकाळी साडेपाच ते साडेसात दरम्यान संत आगमन, दीप प्रज्वलन, प्रमुख पाहुण्यांचे सन्मान, संतांचे आशीर्वचन, पसायदान व महाप्रसादाचा असा कार्यक्रम असणार आहे.
या ठिकाणी मावळ तालुक्यातील हरिभक्त पारायण श्री नंदकुमार दत्तोबा शेटे महाराज तसेच त्यांच्या सौभाग्यवती आशाताई नंदकुमार शेटे यांचा देखील सन्मान करण्यात येणार आहे.