भाजगाव येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर संपन्न
तळेगाव दाभाडे :
इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयाचे भाजगांव येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर २ डिसेंबर ते ८ डिसेंबर २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आले. शिबिरात योग,प्राणायाम, ग्राम स्वच्छता,मान्यवरांची व्याख्याने,गटचर्चा,कोंडेश्वर मंदिराची साफसफाई असे नियमित उपक्रम राबविण्यात आले.शिबिरार्थींसाठी “टाटा पावर हाऊस”येथे भेट आयोजित करण्यात आली. अभ्यास सहल म्हणून शिबिरार्थींना सविस्तर माहिती मिळाली. शिबिर कालावधीत विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी वेळोवेळी भेटी दिल्या.
शिबिराच्या समारोप प्रसंगी गोवित्री ग्रुप ग्रामपंचायतिचे सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य पोलीस पाटील आवर्जून उपस्थित होते सरपंच रोहिदास जांभुळकर म्हणाले की असा हिवाळी कॅम्प आमच्या गावाने प्रथमच पाहिला, अनुभवला विद्यार्थ्यांमधील शिस्त ,नम्रता आम्हाला खूप भावली.आमच्या ग्रामस्थांना या कॅम्पमधून खूप काही शिकायला मिळाले.पुन्हा आमच्याच गावात इंद्रायणी कॉलेजचे शिबिर होण्यासाठी आम्ही आपल्या संस्थेला विनंती करू व आमच्याच गावात पुन्हा पुढील वर्षी कॅम्प घेऊ अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. शिबीरार्थींबरोबर ग्रामस्थांनी सुद्धा कॅम्प फायर चा मनमुराद असा आनंद घेतला. ग्रामस्थांतर्फे कार्यक्रमाधिकारी प्रा. एस.आर . जगताप सर, प्रा. आर.आर.डोके सर, सदस्या प्राध्यापिका भोसले मॅडम, तेलंग मॅडम,भेगडे मॅडम, गाडेकर मॅडम या सर्वांचा सत्कार करण्यात आला. तसेच सर्व शिबिरार्थींचा सुद्धा ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला.ग्रामस्थांसाठी शिबिरार्थींनी विविध कलागुणांचा म्हणजेच विविध गाणी तसेच “महाराष्ट्राची लोकधारा”असे सुंदर कार्यक्रम सादर केले.
विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर संपन्न होण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष आमचे सर्वांचे मार्गदर्शक माननीय श्री रामदासजी काकडे कार्यवाह.श्री.चंद्रकांत शेटे सर्व पदाधिकारी श्री.गोरख काकडे प्राचार्य.डॉ.संभाजी मलघे, उपप्राचार्य प्रा. संदीप भोसले यांचे विशेष सहकार्य मिळाले.