वाढदिवसानिमित्त भव्य महाआरोग्य व रक्तदान शिबीर संपन्न …. 38 नागरिकांचे मोफत मोतीबिंदू, डोळ्याचे ऑपरेशन… शिबिरात 1856 नागरिकांनी घेतला लाभ…

कात्रज पुणे :

दक्षिण पुणे पत्रकार संघाचे क्रियाशील सदस्य तसेच सामाजिक कार्याची आवड असणारे, आदर्श शिक्षक किरण पाटील घोरतळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी वाढदिवसानिमित्त होणारा अनाठाई खर्च टाळून महाआरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी, मोफत डेंटल तपासणी तसेच भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले होते. यावेळी महाआरोग्य शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी, महिलांनी जेष्ठ नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. महिला, शालेय विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद यावेळी दाखवला.

वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थी तसेच नागरिकांसाठी मोफत आधार कार्ड वाटप व दुरुस्ती, मोफत पॅन कार्ड वाटप व दुरुस्ती तसेच आयुषमान भारत कार्ड यांचे मोफत वाटप करण्यात आले आहे. तसेच यावेळी शालेय विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे देखील वाटप करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य, आनंद दिसून येत होते.

Advertisement

या शिबिरासाठी कात्रज, कोंढवा, साईनगर या भागातून नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहण्यात आली. नेत्र तपासणी शिबिरातील मोतीबिंदू झालेल्या 45 नागरिकांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी नोंद झाली आहे .त्यापैकी 38 नागरिकांच्या डोळ्याचे मोफत मोतीबिंदू ऑपरेशन करण्यात आले आहे .

सदरील भव्य महाआरोग्य व रक्तदान शिबिराचे उद्घाटन सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे साहेब यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी मंजुळा शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष सुनील शेठ परदेशी, सचिव दिलीप शेठ परदेशी, प्रभाकर बाबा कदम, विठ्ठलराव वरुडे पाटील,भगवानराव शिंदे, यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. वाढदिवसानिमित्त माय माऊली केअर सेंटर येथील वृद्धांना जेवणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.

या कार्यक्रमासाठी परिसरातील सर्वच मान्यवरांनी उपस्थित राहून किरण पाटील यांना शुभेच्छा दिल्या व असेच प्रकारचे विविध समाजउपयोगी उपक्रम वाढदिवसानिमित्त सर्वांनीच राबवले पाहिजे असे मत यावेळी उपस्थित नागरिकांनी व्यक्त केले..

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page