नवीन समर्थ विद्यालय व जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स तळेगाव दाभाडे येथे अपूर्व विज्ञान मेळावा संपन्न
तळेगाव दाभाडे :
नवीन समर्थ विद्यालय व जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स तळेगाव दाभाडे येथे मंगळवार दिनांक 10/ 12/ 2024रोजी अपूर्व विज्ञान मेळावा घेण्यात आला. या विज्ञान मेळाव्यात एकूण 124 विविध विषयांवरील वैज्ञानिक प्रकल्प विद्यार्थ्यांनी सादर केले .विज्ञान मेळाव्याचे उद्घाटन दैनिक पुढारीचे पत्रकार आणि प्रेस फाउंडेशनचे कार्याध्यक्ष जगन्नाथ उर्फ काकासाहेब काळे , शालेय समिती अध्यक्ष महेश भाई शहा शाळेच्या मुख्याध्यापिका वासंती काळोखे पर्यवेक्षक शरद जांभळे विद्यालयाच्या शिबिर प्रमुख अनुराधा हुलावळे , शिक्षक प्रतिनिधी योगेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक विज्ञान विषय शिक्षिका प्रियंका वनकळस यांनी केले .शाळेतील इयत्ता सातवी व दहावीच्या विद्यार्थिनींनी विज्ञान गीत सादर केले. तसेच विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मानवी जीवनातील विज्ञानाचे महत्व व विज्ञानाची प्रगती या विषयी माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कु.साक्षी गायकवाड हिने केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विज्ञान विषय अध्यापक ज्योती धनवट यांनी केले. सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विज्ञान मेळाव्यातील वैज्ञानिक प्रकल्प पाहण्याचा आनंद घेतला .या विज्ञान मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी विज्ञान विभाग प्रमुख मंजुषा गुर्जर व ज्येष्ठ विज्ञान अध्यापक बापूसाहेब पवार तसेच विद्यालयातील सर्व विज्ञान अध्यापकांनी मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच तसेच प्रयोगशाळा सहाय्यक संजय कसाबी व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले .