पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा येथे दीक्षांत सोहळा संपन्न…
खंडाळा :
पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा येथे नवप्रविष्ठ महिला पोलीस चालक शिपाई सत्र क्रमांक 37 यांचे दीक्षांत संचलन आज दिनांक 18 मार्च 2025 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा येथे माननीय अतुल पाटील पोलीस उप महानिरीक्षक, मोटार परिवहन विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांचे हस्ते पार पडला..
सदर दीक्षांत संचालन कार्यक्रमाकरिता पोलीस प्रशिक्षित केंद्र खंडाळा चे प्राचार्य माननीय मकानदार, उपप्राचार्य लोखंडे सर उपप्राचार्य डहाके सर,
एपिआय बंशी कांबळे, व सर्व अधिकारी अंमलदार तसेच आयएनएस शिवाजी येथील वरिष्ठ अधिकारी श्री सुनील कुमार, प्रसिद्ध उद्योजक व जेष्ठ समाजसेवक माननीय बाबूजी श्री नंदकुमार वाळंज,लायन क्लब लोणावळा लिजंट चे अध्यक्ष सुरेश गायकवाड, कैवल्यधाम येथील अधिकारी, व प्रशिक्षणार्थी तसेच पालक यांचे उपस्थितीत पार पडला.