वीर जिजामाता प्राथमिक कन्या शाळेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी…..
तळेगाव दाभाडे
वीर जिजामाता प्राथमिक कन्या शाळा क्रमांक 5 तळेगाव दाभाडे नगर परिषद येथे 12 जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी नवनिर्वाचित नगरसेविका सौ. शैलेजा काळोखे, सौ.मनीषा मुळे- उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तळेगाव, प्रेरणा ठाकूर सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तळेगाव, सतर्क महाराष्ट्र चॅनेलच्या संपादक रेखा भेगडे , ज्येष्ठ पत्रकार अमीन खान सर ,वार्ताहर डॉ.संदीप गाडेकर , माजी मुख्यध्यापिका सौ.शोभा कांबळे, सेवानिवृत्त शिक्षिका असर मॅडम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेखा केदारी आदी मान्यवर म्हणून उपस्थित होते.
तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या प्रशासन अधिकारी माननीय अनिता वैद्य मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. विजया दांगट व शाळेतील सर्व शिक्षकांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
शाळेतील विद्यार्थिनींनी राजमाता जिजाऊ व विवेकानंद यांच्यावरील समूहगीते सादर केली. तसेच शाळेतील इयत्ता तिसरी ते पाचवी विद्यार्थिनींची ‘मुखवटे तयार करणे’ ही स्पर्धा तर इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची टॅटू काढणे ही स्पर्धा घेण्यात आली. विशेष बाब म्हणजे या दिवशी शाळेत माता पालकांची पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. शाळेतील माता पालकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमातील पाककला या स्पर्धेमध्ये उत्साहाने भाग घेतला.
स्पर्धांचे परीक्षण कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच इतर उपस्थित मान्यवर यांनी केले. त्यातून तीन क्रमांक काढण्यात आले. मकर संक्रांती निमित्ताने महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम देखील घेण्यात आला या कार्यक्रमाला महिला पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
विविध स्पर्धांचे निकाल खालीलप्रमाणे.
मुखवटे तयार करणे स्पर्धा —
१)दिपाली कंबर ५ वी
२) रिया कोल ३री
३) इकरा शेख ३री
टॅटू काढणे स्पर्धा —
१) राधिका म्हेत्रे ८ वी
२) जोया मन्सूरी ६वी
३)धनश्री होणावळे ७वी
पाककृती स्पर्धा —
१) सौ. सुरेखा केदारी
२) सौ. शुभांगी भालेकर
३) रुक्सार शेख
अध्यक्षीय भाषणात नगरसेविका शैलजा काळोखे यांनी विद्यार्थिनींना जिजाऊंचे आचार विचार सध्याच्या काळात किती महत्वाचे आहेत हे सांगितले. पत्रकार रेखा भेगडे यांनी जिजाऊंची प्रेरणा घेण्याचे आवाहन शाळेतील विद्यार्थिनींनी केले. डॉ.संदीप गाडेकर सरांनी विवेकानंदांचे विचार सांगितले.अमीन खान यांनी देखील विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. सौ. पुष्पा कांबळे या पालकांनी जिजाऊ वंदना विद्यार्थिनींकडून म्हणून घेतली.
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी सहकार्य केले. यात शाळेतील शिक्षिका सौ.मनिषा लांजेकर, सौ . आशा गायकवाड , धनश्री चौधरी , प्रज्ञा राठोड, पल्लवी ठाकरे,शिक्षक सागर उकिरडे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. तनुजा मांढरे मॅडम यांनी केले. आभार श्री.सागर सांगळे सर यांनी मानले.






