लोणावळ्यात केवरे गाव रेल्वे फाटकजवळ एक अनोळखी पुरुष इसम गाड़ीच्या धड़केने गंभीर जखमी, डॉक्टरांनी केले मृत घोषित.

SHARE NOW

लोणावळा :

मंगळवार दिनांक 25 जून रोजी लोणावळ्यात केवरे गाव ,रेल्वे फाटक नं.३४ जवळ अंदाजे,४०वर्ष वयाचे अनोळखी पुरुष अंगात भगव्या रंगाचा टी शर्ट त्यावर “प्रभात गोल्ड चाय ,अकोला असे लिहलेले असून निळ्या रंगाची ट्रैक पैंट,उजव्या हाताला भगव्या रंगाचा दोरा , अंगात भगव्या रंगाचे उपरने अशा वर्णनाच्या अनोळखी बेवारस पुरुषास गाडीने धड़क दिल्याने तो गंभीर जखमी झाल्याने दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. नमुद बेवारस अनोळखी पुरुषाचे नाव, गाव ,पत्ता, तसेच नातेवाईक, याची माहिती कळविण्यास नागरीकांना आवाहन केल्याचे लोहमार्ग पोलिसांकडून सांगण्यात आले.

Advertisement

सदर प्रकरणाचा तपास लोहमार्ग वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक हर्षवर्धन, आर . मस्के करीत आहेत.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page