बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार निकाल पाहण्यासाठी खालील संकेत स्थळांचा उपयोग करा.
महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल उद्या जाहीर केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा कडून निकालासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.त्यानुसार महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता जाहीर केला जाणार आहे.
खालील संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल पाहता येईल –
https://mahahsscboard.in
https://results.digilocker.gov.in
https://mahahsscboard.in
https://hscresult.mkcl.org
https://results.navneet.com
https://www.tv9hindi.com/education/board-exams/maharashtra-board-exams
असा पहा निकाल
१. सर्वात आधी महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट अथवा वर दिलेल्या कोणत्याही एक संकेतस्थळावर क्लिक करा.
२ . वेबसाइट वर गेल्यावर तिथे HSC च्या लिंकवर क्लिक करा.
३ . लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमचा परिक्षा क्रमांक आणि इतर माहिती त्यामध्ये टाका.
४.त्यानंतर सबमिट बटण दिसेल तिथे क्लिक करा.
५ .त्यानंतर तिथे निकाल स्क्रीनवर दिसेल. मग तो सेव्ह करा आणि प्रिंट काढा .