तळेगाव दाभाडे येथे श्री. स्वामी समर्थ जयंती निमित्त पालखी सोहळा व महाप्रसादाचे आयोजन.

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित )तळेगाव येथे श्री. स्वामी समर्थ जयंती निमित्त व स्वामींच्या प्रगट दिनाचे औचित्य साधून स्वामींचा पालखी सोहळा व महाप्रसाद याचे आयोजन करण्यात आले आहे.

या पालखी सोहळ्यातील धार्मिक कार्यक्रमात स्वामींच्या मंत्राचे हवन दु.3वा. सुरु होऊन स्वामींच्या चरित्र ग्रंथाचे वाचन, हवन सायं.5 वाजेपर्यंत राहील.

पालखी सोहळ्याची सुरुवात सायं.5 ते 8.30 वाजेपर्यंत राहील.

Advertisement

पालखीचा मिरवणूक मार्ग, श्री सप्तश्रुंगी मंदिर, इंद्रायणी कॉलनी मार्गे, आनंदनगर, मनोहरनगर, सप्तश्रुंगी मंदिर असा राहील परतीचा मार्ग सप्तश्रुंगी मंदिर पासून सिमको कोलनी, मोहननगर मार्गे सप्तश्रुंगी मंदिर असा असेल असे आयोजकांकडून सांगण्यात आले.

आरती झाल्यावर महाप्रसाद रात्री,8.30. वा सुरु होईल.

तळेगाव मध्ये होणाऱ्या या पालखी सोहळा व महाप्रसाद या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजक आहेत सौ. सारिकाताई गणेश काकडे (अध्यक्ष :- सिद्धिविनायक प्रतिष्ठान, तळेगाव स्टेशन)आणि स्वामी समर्थ सेवा केंद्र, तळेगाव स्टेशन यांनी केले आहे..


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page