साप्ताहिक अंबरच्या वतीने श्रीमती शांताबाई मोहनराव काकडे यांना जीवनगौरवाप्रीत्यर्थ मानपत्र प्रदान करण्यात आले.
तळेगाव दाभाडे :
साप्ताहिक अंबरच्या वतीने श्रीमती शांताबाई मोहनराव काकडे
यांना जीवनगौरवाप्रीत्यर्थ मानपत्र रविवारी(दि.०७)प्रदान करण्यात आले.
श्री क्षेत्र देहू येथे त्यांचा जन्म झाला. तेथील सुप्रसिद्ध कंद पाटील घराण्यातील या कन्या आहेत. पुढे तळेगाव दाभाडे येथील सुप्रसिद्ध काकडे घराण्यातील कर्तबगार व्यक्तिमत्त्व स्व. पै. मोहनराव यांच्याशी त्यांचा विवाह झाला.
पती स्व. पै. मोहनरावांच्या निधनानंतर प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी संसार केलाच, पण वीटभट्टीचा असलेला व्यवसायही वृद्धिंगत केला, अनेक आव्हाने पेलत त्यांनी उद्योजक किरणजी काकडे, माजी उपनगराध्यक्ष श्री गणेशजी काकडे या त्यांच्या मुलांना त्यांनी कौटुंबिक संस्कारमुल्यांची शिकवण देत त्यांच्यात सामाजिक दातृत्व निर्माण केले काळोखे आणि खांडगे या घराण्याशी त्यांचे नातेसंबंध असून दोन दीर, दोन भावजया, तीन नणंद, नऊ नातवंडे हे सर्वजण आता समाजात मानाचे स्थान मिळवून आहेत.
थोरली सून सौ. मंगल व धाकटी सून सौ. सारिका यांना बरोबर घेऊन दरवर्षी श्री स्वामी समर्थ पालखी सोहळा, नवरात्र उत्सव, दिंडोरी प्रणित गुरुचरित्र पारायण सोहळा आयोजित करून धार्मिक व अध्यात्मिक कार्य करीत आहेत. सतर्क महाराष्ट्राच्या संपादिका रेखा भेगडे यांच्या वतीने आईसाहेब शांताबाई काकडे यांचे अभिनंदन!