रात्री अपरात्री गोंधळ घालणाऱ्या हुल्लडबाजवर कारवाई, चार नर्तिकासह दहा जणांवर गुन्हा दाखल

लोणावळा :

लोणावळा शहरातील तुंगारली परिसरातील एस चार नावाच्या बंगल्यातील प्रांगणात काही लोक सार्वजनिक शांततेचा भंग करून रात्री उशिरापर्यंत साऊंड सिस्टिम लावून मोठमोठ्याने गाणी लावून त्यांनी सोबत आणलेल्या मुलींकडून अश्लील हावभाव करून नाच करायला लावत आहेत. अशी गोपनीय बातमी. सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी लोणावळा विभाग यांना प्राप्त झाल्याने त्यांनी तात्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी व लोणावळा शहर पोलीस स्टेशन यांचेकडील पोलीस स्टाफ यांचे संयुक्त टीम तयार करून कारवाई करण्याचे आदेश दिल्याने सदर ठिकाणी एस चार नावाच्या बंगल्यावर छापा टाकून अश्लील हावभाव करून साऊंड सिस्टम लावून मोठ मोठ्याने गाणी लावून नाच करून सार्वजनिक शांततेचा भंग करीत असलेल्या एकूण नऊ जणांना ताब्यात घेऊन त्यांचे ताब्यातील साऊंड सिस्टम जप्त करून त्यांच्यावर लोणावळा शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

लोणावळा शहर व परिसरातील बंगले मालकांना आवाहन करण्यात येते की , त्यांनी त्यांच्याकडील बंगला भाड्याने देताना त्यांच्या बंगल्यामध्ये कोणतेही बेकायदेशीर कृत्य होणार नाहीत याची दक्षता घेतील व बंगला भाड्याने दिलेली माहिती पोलीस स्टेशनला सादर करतील अन्यथा त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आवाहन सहाय्यक पोलीस अधीक्षक लोणावळा विभाग सत्यसाई कार्तिक व सुहास जगताप पोलीस निरीक्षक लोणावळा शहर पोलीस स्टेशन यांच्याकडून करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे लोणावळा शहरातील भाड्याने दिले जाणाऱ्या बंगल्यांची माहिती संकलित करण्याचे काम लोणावळा शहर पोलीस स्टेशन कडून करण्यात येत आहे. तरी ज्यांचे बंगले भाड्याने दिले जात आहे त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्याचे संपर्क साधून आपल्या बंगल्याची माहिती सादर करावी.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख पुणे ग्रामीण यांच्या आदेशान्वये व मा. अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्य साई कार्तिक लोणावळा उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुहास जगताप लोणावळा शहर पोलीस स्टेशन यांच्या सूचनेनुसार पोसई श्रीकांत जोशी, पोहवा /आबनावे,, पोना /शिंदे, पोशि / सोनवणे, मपोशि / निंबाळकर, पोशि /90शिंदे, पोशि येळवंडे, चापोहवा/घोंगडे, चापोना /पवार यांनी केली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोसई श्रीकांत जोशी करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page