निधन वार्ता प्रल्हाद कृष्णाजी भोसले ( सर ) यांचे निधन
तळेगाव दाभाडे : सातारा जिल्ह्यातील खातगुण ( ता.खटाव ) या मुळगावी प्रल्हाद कृष्णाजी भोसले यांचे शुक्रवार दि.२९ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री एक वाजता हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.वयाच्या ८५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला असून दशक्रिया ८ डिसेंबर व तेरावा विधी ११ डिसेंबर २०२४ ला त्यांच्या मुळ गावी होणार आहे.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळ संस्थेतील म्हाळसाकांत विद्यालय आकुर्डी येथून ते सेवानिवृत्त झाले होते पुणे जिल्हा शिक्षण मंडळात आणे,न्हावी, वानेवाडी येथे त्यांनी अध्यापनाचे अनेक वर्ष काम केले होते देहू येथे वास्तव्य असल्याने धार्मिक क्षेत्रात सुद्धा त्यांनी अनन्यसाधारण कामगिरी केली होती. शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना आपली दोन मुले व तीन मुलींना चांगले शिक्षण देऊन घडविण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
सेवानिवृत्तीनंतर कृषी क्षेत्रात आवड असल्याने आपल्या मूळ गावी खात गुण ता. खटाव जिल्हा सातारा येथे आले पिकाची शेती करून शेती क्षेत्रात एक नाविन्यपूर्ण प्रयोग करून आल्याचे विक्रमी उत्पादन घेतले होते.तसेच उसाची शेती करत असताना यामध्ये त्यांचे बंधू सूर्यकांत,मोहन, नवनाथ,रामदास यांच्या सहकार्यातून आधुनिक पद्धतीने शेती केली होती.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले तीन मुली,सूना, जावई,नातवंडे,पतवंडे असा मोठा परिवार आहे. इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेतील इंद्रायणी महाविद्यालय तळेगाव दाभाडे येथील उपप्राचार्य प्राध्यापक संदीप भोसले व पद्मावती माध्यमिक विद्यालय उर्से येथील ज्येष्ठ शिक्षक संतोष भोसले तसेच म्हाळसाकांत कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापिका साधना रमेश आंबोले यांचे ते वडील होत.