मळवंडी ठुले धरणात बुडून एकाचा मृत्यू
पवनानगर:
मळवंडी ठुले धरण परिसरातील तिकोणा गावाच्या हद्दीत दि.२९ आँक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एकाचा पाय घसरून मृत्यू झाला आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन ने दिलेल्या माहितीनुसार तिकोणा गावच्या हद्दीतील एका बंगल्यावर गवंडी काम करत असलेला वडील, मुलगा व एक मंजूर सायंकाळी काम आवरल्यावर मळवंडी ठुले धरणावर हातपाय धुवण्यासाठी गेले असता. सोहम अनिल पवार वय.१५ वर्षे रा.उरवडे ता.मुळशी जि. पुणे हा धरणात उतरला होता.पंरतु त्याचा पाय घसरला असल्याने तो धरणाच्या गाळात गेला.यावेळी इतर दोघांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पंरतु त्याचा तो पर्यंत मृत्यू झाला होता.
यामध्ये सोहम अनिल पवार वय.१५ वर्षे रा.उरवडे ता.मुळशी जि. पुणे यांचा मृत्यू झाला असून पुढील तपास
लोणावळा ग्रामीण चे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे सहायक पोलीस निरीक्ष प्रशांत आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हावलदार नवनाथ चपटे,प्रशांत तुरे,भिमा वांळुज हे पुढील तपास करत आहे.






