देहूरोड येथे स्वर्गीय इंदिरा गांधी व लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन
देहूरोड : भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि देशाच्या एकतेचे शिल्पकार लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा नगरसेवक हाजीमलंग मारीमुत्तू यांच्या हस्ते स्वर्गीय इंदिरा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमात नगरसेवक हाजीमलंग मारीमुत्तू तसेच अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष गफूरभाई शेख यांनी आपल्या मनोगतातून देशाच्या एकात्मतेसाठी व लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी दोन्ही महान नेत्यांच्या कार्याचा आदर्श ठेवण्याचे आवाहन केले.
यावेळी व्यंकटेश मारीमुत्तू, शक्ती स्वामी, रामस्वामी रत्तू यांच्यासह ब्लॉक काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रसेवेच्या आणि एकतेच्या भावनेने भरलेला हा कार्यक्रम देशभक्तीच्या वातावरणात पार पडला.






