तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत पदवीधर / शिक्षक मतदार संघासाठी मतदार नोंदणी प्रक्रिया सुरू

SHARE NOW

तळेगाव दाभाडे:

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतर्फे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी नवीन मतदार नोंदणीची प्रक्रिया सुरु झाली आहे. ही नोंदणी ७ नोव्हेंबर २०२5 रोजी पूर्ण होणार असून, पात्र नागरिकांनी वेळेत अर्ज सादर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

ठिकाण: श्री गजानन महाराज मंदिर. तुकाराम नगर तळेगाव दाभाडे. वेळ सकाळी १०ते दुपारी .१ वाजेपर्यंत

 

 

 

महत्त्वाच्या तारखा व पात्रता

 

नोंदणीची अंतिम तारीख: ७ नोव्हेंबर २०२5

 

पात्रता:

 

1. अर्जदार किमान तीन वर्षांपूर्वी पदवीधर असावा.

 

 

2. तो पुणे विभागातील निवासी असावा (पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्हे).

 

 

3. शिक्षक मतदारसंघासाठी संबंधित शैक्षणिक संस्थेत किमान तीन वर्षे अध्यापनाचा अनुभव आवश्यक.

 

 

 

 

 

 

 

आवश्यक कागदपत्रे

 

1. नोंदणी अर्ज क्रमांक ८

 

 

2. पदवी प्रमाणपत्र / अंतिम वर्षाची गुणपत्रिका

 

 

3. पासपोर्ट आकाराचा फोटो

 

 

4. ओळखपत्र (पॅनकार्ड / आधार कार्ड / ड्रायव्हिंग लायसन्स / पासपोर्ट)

 

 

5. नाव बदल असल्यास विवाह प्रमाणपत्र / गॅझेट प्रत

Advertisement

 

 

6. रहिवासी पुरावा (आधार कार्ड / बँक पासबुक / पोस्ट ऑफिस पासबुक / वीज बिल / भाडेकरारपत्र / पाणी बिल इ.)

 

 

 

 

 

 

ऑनलाइन नोंदणीसाठी सूचना

 

नोंदणीसाठी अर्जदारांनी https://mahaelection.gov.in या संकेतस्थळावर जाऊन खालील प्रक्रिया करावी:

 

1. मोबाईल नंबर टाकून नोंदणी करणे

 

 

2. “I AM NOT REGISTERED” हा पर्याय निवडणे

 

 

3. “Graduates’ Constituency” किंवा “Teachers’ Constituency” मध्ये Pune Division निवडणे

 

 

4. वैयक्तिक माहिती, शैक्षणिक तपशील आणि रहिवासी पत्ता भरावा

 

 

5. आवश्यक कागदपत्रे अपलोड करून Declaration स्वीकारणे व Submit करणे

 

 

 

 

 

 

अपलोड करण्यासाठी आवश्यक फाईल्स

 

फोटो (100 KB)

 

सही (100 KB)

 

पदवी प्रमाणपत्र

 

रहिवासी पुरावा (आधार कार्ड, पासबुक, वीज बिल इ.)

महत्त्वाची सूचना

ऑनलाइन अर्ज करताना दिलेल्या माहितीची सत्यता तपासण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी मागणी केल्यास मूळ कागदपत्रे सादर करावी लागतील.

गॅझेटेड अधिकाऱ्यांकडून साक्षांकित केलेले छायांकित प्रती जोडणे आवश्यक आहे.

अधिक माहितीकरिता संपर्क

 

विजयकुमार सरनाईक मुख्याधिकारी, तळेगाव दाभाडे नगरपरिषद

सुरेद्र नवले. प्रशासक


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page