मशीनच्या नवनिर्माण मुळे गोरगरीब जनतेचा आरोग्यावरील खर्च कमी होईल. डॉ प्रवीण गडशिंग( बाल रोग तज्ञ)

SHARE NOW

 

पुणे शहरातील नामवंत हौस्पिटल IIMS व जाई वात्सल्य फाउंडेशन पुणे महाराष्ट्र. आयोजित आरोग्य शिबीर आंबवणे येथे कोराईगड शिक्षण संस्था संचालित सोनू अनाजी वाळंज माध्यमिक विद्यालय येथे सपन्न झाले.

विज्ञानातील प्रगतीचे आरोग्य विषयक तंत्रज्ञान विकासात दिसून आले. नवनिर्माण चे उत्तम उदाहरण म्हणून एकाच मशीन द्वारे मानवी शरीरातील 60 पेक्षा अधिक चाचण्या शिबिरात आणलेल्या मशीन द्वारे केल्या. व त्याचा आरोग्य अहवाल 10 मिनिटाच्या आत आपल्या मोबाईल व्हाट्सअप,जीमेल वर कळवला जातो. आणि पुढील डायट प्लॅन सांगितला जातो.

अशी माहिती डॉ. प्रवीण गडशिंग यांनी सांगितले.

ते म्हणाले कि, भविष्यात या मशीन च्या वापरामुळे गोरगरीब जनतेला जास्त खर्च येणार नाही. व आमच्या सारख्या डॉकटर्स ला जनतेची सेवा करण्याची संधी या निमित्त मिळेल.

Advertisement

या प्रसंगी निवृत्त RTO मा. हरिश्चन्द्र गडशिंग, कोराईगड शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व जेष्ठ समाजसेक मा. नंदकुमार वाळंज, डॉ. प्रवीण गडशिंग, मा. आदर्श सरपंच सौं. वत्सलाताई वाळण, सामाजिक कार्यकर्ते सुरेशदादा कालेकर डॉ प्रवीण गडशिंग, डॉ विक्रम पाटोळे,डॉ. रोहिणीताई गडशिंग, डॉ सुहाशिनी घाणेकर, डॉ महेश तांगडे,, श्रीशा शेट्टी, अमोल मोरे, दीपक पाटील मान्यवर व IIMS हौस्पिटल टीम उपस्थित होती.

 

या शिबिरात दोनसे विद्यार्थी तपासणी करण्यात आली. तसेच शंभर पेक्षा जास्त जेष्ठ नागरिकांची मशीन द्वारे तपासणी केली. व लगेंच रिपोर्ट देण्यात आला. या कार्यक्रमात पालक वर्ग पंचक्रोशी तील आजी – माजी सरपंच, उपसरपंच,सदस्य पोलीस पाटील वयोरुद्ध नागरिक उपस्थित होते.शिक्षक श्री

संजय कुलथे यांनी सूत्रसंचालन केले, मुख्याध्यापक श्री भटू देवरे यांनी IIMS हौस्पिटल चे व जाई वात्सल्य फाऊंडेशन यांचे मनस्वी आभार मानले.

विद्यालयातील सर्व शिक्षक कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page