निष्पाप चिमुरडीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा.तर आईला ७ वर्ष कारावास ची शिक्षा

SHARE NOW

पवनानगर

पुणे जिल्हातील मावळ मधील कोथुर्णे गावातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी विशेष पॉक्सो न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. या घटनेतील एका आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर आरोपीच्या आईला ७ वर्ष कारावास ची शिक्षा करण्यात आली आहे.या प्रकरणात दोघांना आरोपी करण्यात आले होते.तर २ आँगस्ट २०२२ रोजी पुणे जिल्ह्यातील कोथुर्णे गावातील अल्पवयीन मुलगी घराबाहेर खेळत होती.आरोपींने मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना समोर आली होती. याप्रकरणी २२ मार्च २०२४ रोजी विशेष न्यायालयाने दोषीला फाशीची शिक्षा सुनावली. तर आरोपीच्या आईला ७ वर्षाचा कारावास ची शिक्षा सुनावली आहे.

२ आँगस्ट २०२२ रोजी कामशेत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोथुर्णे गावात घडलेल्या या घटनेत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास २४ तासात करून मुदतीत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.२९ महिन्याच्या सुनावणीनंतर न्यायालयाने २२ मार्च २०२४ रोजी या प्रकरणी शिक्षा सुनावली आहे. पोक्सो कायद्याचे विशेष न्यायाधीश बी.पी.क्षिरसागर यांनी शुक्रवारी एका निष्पाप मुलीवर बलात्कार आणि खून केल्याप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा व आरोपीच्या आईला ७ वर्षाचा कारावासाची शिक्षा सुनावली आहे.न्यायालयाने या प्रकरणी १७ महिने २० दिवसांत निकाल दिला आहे.

 

मुलीच्या वडिलांनी गुन्हा दाखल केला होता.

Advertisement

कामशेत पोलीस स्टेशन परिसरातील कोथुर्णे गावातील एका तरुणाने २ आँगस्ट २०२२ रोजी आपल्या मुलीवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे की, २ आँगस्ट २०२२ रोजी दुपारी ०३:३० वाजता ७ वर्षांची मुलगी घराबाहेर खेळत होती. यादरम्यान ती बेपत्ता झाली. शोध घेत असताना घराच्या हक्केच्या अंतरावर असलेल्या शाळेच्या मागे ३ आँगस्ट रोजी दुपारी ०१:०० च्या तिचा मृतदेह आढळून आला. जिल्हा परिषद शाळे जवळ मृतदेह आढळून आल्याने कुटुंबीय हादरले. या प्रकरणी पोलिसांनी मुलीवर बलात्कार केल्यानंतर गळा आवळून खून केल्याचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. २९ जणांच्या साक्षीनंतर निर्णय फिर्यादीनुसार, मुलीवर बलात्कार आणि हत्येप्रकरणी मुद्दतीत आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात २९ जणांनी न्यायालयात साक्ष दिली. सरकारी वकील अँड.राजेश कावेडिया यांनी युक्तिवाद केला. कोथुर्णे गावातील रहिवासी असलेल्या आरोपी तेजस उर्फ दादा महिपती दळवी (वय.२६)याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली.तर दुसरे आरोपी तेजस दळवी यांच्या आईचा देखील या गुन्ह्यात सहभाग आढळला होता. गुण्याचे पुरावे नष्ट करण्याचा तिने प्रयत्न केला होता. त्याबाबत तिला सात वर्षाचा कारावासाचे शिक्षा सुनावण्यात आली आहे.शिक्षा सुनावल्यानंतर पोलिसांनी तेजसला तुरुंगात नेले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page