मोटारसायकल चोरास मोठ्या शिताफीने केले अटक तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनची उत्तम कामगिरी
मावळ :
तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन भाग पाच गुन्हा रजिस्टर नंबर ७२/२२५ भारतीय न्याय संहिता कलम 302 (2), 317 (2),3(5).
श्री संतोष शिवनारायण यादव वय 35 वर्ष धंदा नोकरी राहणार बाळू पडवळ यांच्या खोलीत भाड्याने सावसार वस्ती नवलाख उंबरे तालुका मावळ जिल्हा पुणे यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्यादी होती की दिनांक 5 एप्रिल 2025 रोजी त्यांच्या मालकीची हिरो होंडा डिलक्स कंपनीची मोटरसायकल नंबर एम एच 14 एल एफ 42 67 ही रात्री अकरा वाजून 40 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरासमोर लॉक करून पार केली असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली आहे अशी फिर्याद त्यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार जाधव हे करीत होते.
सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने व पोलीस निरीक्षक करंजी जाधव यांनी तळेगाव एमआयडीसी तपास पथकाचे पोसई विवेक गोवारकर, पोहवा अनंत रावन पोना ज्ञानेश्वर सातकर, पो कॉन्स्टेबल रमेश घुले, विनायक शेरमाळे, स्वराज साठे, भीमराव खिलारे यांना गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या. तळेगाव एमआयडीसी तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हे नमूद गुन्ह्याच्या आरोपीच्या बाबत माहिती घेत असताना पोहवा अनंत रावण, पोना ज्ञानेश्वर सातकर यांना मिळाले गोपनीय बातमीवरून इसम नामे अनिल दत्ता पवार या ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कौशल्य पूर्व तपास केला असता त्याने सदर मोटरसायकलची बनावट चावी बनवून मोटर सायकल चोरी केली असून सदरची मोटर सायकल इसमना मे युनोस चांदखा पठाण यांच्याकडे विक्रीकरिता दिली आहे अशी हकीकत सांगितल्याने युनूस पठाण याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतल्यास तास जर गुन्ह्यातील मोटरसायकल ही त्याने लपून ठेवले त्याची माहिती दिल्याने पोलीस हवालदार सुरेश जाधव यांनी सदरची मोटरसायकल जप्त केली आहे. सदर गुन्ह्याच्या तपासात आरोपी 1) अनिल दत्ता पवार
2) युनूस चांदखा पठाण यांना दिनांक पाच एप्रिल रोजी अटक करण्यात येऊन दिनांक सात एप्रिल पर्यंत पोलिस रिमांड घेण्यात आले होते.
सदरचा गुन्हा वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत जाधव तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोसई विवेक गोवारकर, पोहवा अनंत रावण, सुरेश जाधव, पोना ज्ञानेश्वर सातकर, पो कॉ स्वराज साठे रमेश घुले विनायक शेरमाळे भीमराव खिलारे यांनी उघडकीस आणला.
गुन्हा उघडकीस आणण्याकरता पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले