*एस. एन.बी.पी. विधी महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन*
पिंपरी चिंचवड:
एस. एन.बी.पी. विधी महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच मोठ्या ऊत्साहत पार पडले. सदर कार्यक्रम प्रसंगी जे. एम.एफ. सी परीक्षेत यश मिळेवलेल्या अक्षय ताटे व स्नेहा बोडके या माजी विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुणे श्री राजेंद्र उमाप व एस. एन.बी.पी. ग्रुपच्या डायरेक्टर ऋतुजा भोसले यांच्या हस्ते सत्कार करणेत आला. तसेच बेस्ट अकेडमिक स्नेहल लांडगे, बेस्ट एकटीविटी प्रताप महोड, बेस्ट मुटर प्रेम चिचवडे व स्टुडन्त ऑफ द इयर निशिका वेलूवली यांना गौरविण्यात आले.
या कार्यक्रमात एस. एन.बी.पी. ग्रुपचे चेअरमन डॉ. डी. के. भोसले , डायरेक्टर मा. ऋतुजा भोसले यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या राष्ट्रीय मूल्याकन व अधिस्वीकृती परिषदेच्या मूल्याकन प्रक्रियेमध्ये विशेष कार्य करणा-या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याचा प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सत्कार केला. याप्रसंगी एस. एन.बी.पी. विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भारत डोंगरे, डॉ. रोहिणी जगताप , उप-प्रा. कैलास पोळ, प्राचार्या प्रियांका अग्रहारी ऊपस्थित होत्या.
तत्पूर्वी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री राजेंद्र उमाप यांनी विद्यार्थ्यांना सनद नोंद ऑनलाईन प्रक्रियेसंबधी माहिती दिली व व्यावसायिक जबाबदारीची जाणीव करून दिली व महाविद्यालयास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.