आळंदी मंदिरातून १९ जूनला माऊलींचे पालखी सोहळ्याचे प्रस्थान गुरुवार दिनी प्रस्थान ला होणार उशीर
आळंदी ( प्रतिनिधी ) :
श्री संत ज्ञानेश्वर महाराज आषाढ पायी वारी पालखी सोहळ्याचे आळंदी मंदिरातून गुरुवार १९ जून २०२५ ला गुरुवार श्रींचे पालखीची मंदिर प्रदक्षिणा झाल्यावर रात्री उशिरा हरिनाम गजरात होणार आहे.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरातून आषाढी वारी २०२५ साठी श्रींचे पालखी सोहळ्याचे हरिनाम गजरात पंढरपूरकडे १९ जून रोजी प्रस्थान होणार आहे. सोहळ्यातील मुख्य आषाढी एकादशी ६ जुलै रोजी पंढरपूर येथे राज्यातून आलेल्या लाखो वारकरी भाविक भक्तांच्या उपस्थितीत हरिनाम गजरात साजरी होत आहे. आषाढ पायी वारी २०२५ पालखी सोहळ्याचे नियोजन पूर्व आढावा बैठक पंढरपूर येथे झाली. या बैठकीत पालखी सोहळा दिंडी समाज मान्यवर दिंडीकरी, फडकरी, पालखी सोहळा प्रमुख, वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित होते. पालखी सोहळ्याची पत्रिका लवकरच श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने जाहीर करण्यात येईल असे श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे मुख्य व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी सांगितले.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी राज्यातून लाखो भाविक आळंदी येथे श्रींचे प्रस्थान सोहळ्यासाठी येत असतात. शेकडो दिंड्या आळंदीतून हजारो भाविकांच्या हरिनाम गजरात मार्गस्थ होत असतात. भाविकांना सोहळ्याचे काळात गैरसोय होऊ नये यासाठी या बैठकीत चर्चा, सुसंवाद साधत मार्गदर्शन करण्यात आले. श्रींचे पालखी सोहळ्यासाठी हरिनाम गजर करीत पंढरीस श्रींचे दर्शनास वारकरी भाविक निघतात. सोहळ्याचे तारखा निश्चित करण्यासाठी पंढरपूर येथील माऊली मंदिरात सोहळ्यातील ठराविक दिंडी प्रमुखांची, पालखी दिंडी समाजची बैठक झाली. या बैठकीत परंपरेने २९ जून २०२५ रोजी आळंदीतून माऊलींचे पालखी सोहळ्याचे प्रस्थान होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. सोहळ्यातील मुक्काम, गोल रिंगण, उभे रिंगण आदी कार्यक्रम लवकरच जाहीर केले जातील. यावर्षी पंढरपूर येथे आषाढी एकादशी ६ जुलै रोजी साजरी होत असल्याचे आळंदी मंदिराचे मुख्य व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले.