*सरगम म्यूझिकल नाईट, सदाबहार गाण्यांचा स्व. मोहम्मद रफी फॅन क्लब चा उपक्रम !
तळेगाव दाभाडे :
मोहम्मद रफी फॅन क्लब तळेगाव दाभाडे आयोजित सदाबहार जुन्या हिंदी गीता चा कार्यक्रम दि २२.१२.२४ रोजी कलापिनी सांस्कृतिक कला केंद्र येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विलास काळोखे, सुरेश धोत्रे, संतोष दाभाडे, बिजेंद्र किल्लावाला,संकेत खळदे,अशोक काळोखे,मनोज ढमाले,भगवान शिंदे,बॉबी लाला,संग्राम जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना अध्यक्ष श्री नितीन खळदे यांनी संस्थेचे कार्य विशद केल.संस्थापक अध्यक्ष श्री सूर्यकांत काळोखे यांनी प्रास्ताविक केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री आरिफ सय्यद यांनी केले तर आभार श्री बाळासाहेब लोणकर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरेश शेंडे, तुषार खेरडे, अमित कुलकर्णी, पठाण, यश हंबीर सुधीर टकले सतिश देशपांडे तसेच सर्व सभासदांनी प्रत्यन केले. या कार्यक्रमासाठी नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.