बाल विकास विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा जल्लोषात साजरा.

तळेगाव दाभाडे.

स्नेहवर्धक मंडळ सोशल व एज्युकेशनल ट्रस्टच्या बालविकास विद्यालयात दरवर्षीप्रमाणे यंदाही वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा जल्लोषात पार पडला. दिनांक 20डिसें ,21 डिसें व 22 डिसेंबर 2024 या तीन दिवसात – पूर्व प्राथमिक विभाग प्राथमिक विभाग, माध्यमिक विभाग, ज्युनियर कॉलेज, व बीएड कॉलेज यांचे वार्षिक स्नेहसंमेलन व विज्ञान व चित्रकला प्रदर्शन, आनंद बाजार हे कार्यक्रमआयोजित करण्यात आले .

दिनांक 20 डिसेंबर 2024रोजी सायंकाळी चार वाजता पूर्व प्राथमिक विभाग व प्राथमिक विभाग यांचे वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ अपर्णा पांडे (Principal NCER Talegaon Dabhade) होते. अध्यक्ष भाषणात कौतुक करत मार्गदर्शन केले.

पूर्व प्राथमिक विभाग व प्राथमिक विभाग यांनी महाराष्ट्राची लोकधारा या संकल्पनेवर आधारित नृत्य सादर केले. विविध जुनी आणि नव्या गीतांचा यामध्ये समावेश होता . कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन छोट्या विद्यार्थ्यांनी सुंदरपणे केले.पालक व विद्यार्थी यांनी यामध्ये उस्फूर्त सहभाग दर्शविला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत वंदना भोळे यांनी केले , मुख्याध्यापिका  नूतन कांबळे यांनी वार्षिक अहवाल सादर केला .सूत्रसंचालन  श्रद्धा तांबडे,आभार अमृता देशमुख यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व शिक्षकांनी यात विशेष सहभाग दर्शविला.

21 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी चार वाजता माध्यमिक विभाग ज्युनिअर कॉलेज आणि बीएड कॉलेज यांचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या जल्लोषात पार पडले.  (Principal NMIET Talegaon Dabhade maval Pune)विलास धोत्रे यांना प्रमुख अतिथी म्हणून बोलाविण्यात आले होते.

प्रास्ताविक व स्वागत पर्यवेक्षक  सागर केंजुर, मुख्याध्यापिका नूतन कांबळे यांनी वार्षिक अहवाल सादर केला.

लाईफ ए सेलिब्रेशन या संकल्पनेवर आधारित गीतांवर नृत्य सादरीकरण करण्यात आले यामध्ये प्रथम गणेश वंदना, सरस्वती वंदना, व विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर केला. यावेळी कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी हिरेरीने सहभाग दर्शवून कार्यक्रम यशस्वी केला.

22 डिसेंबर 2024रोजी सायंकाळी 4 वाजता आनंद बाजार व विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष सुरेश चौधरी,संजय संधानशीव, निंबाळकर ,मान्यवर पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बाल विकास संगीत रजनीच्या विद्यार्थ्यांनी गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिव्या भारती यांनी केले.विद्यालयात विज्ञान प्रदर्शन तसेच चित्रकला व हस्तकला प्रदर्शन भरविण्यात आले होते .यामध्ये विज्ञान प्रदर्शनात विविध प्रकारचे प्रायोगिक उपकरण ठेवण्यात आले होते. स्वयंचलित तसेच इलेक्ट्रिक व माहितीपूर्ण असे प्रयोग प्रदर्शनामध्ये मांडण्यात आले. तसेच चित्रकला व हस्तकला यात विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला.

Advertisement

प्रदर्शन यशस्वी  पार पाडण्यासाठी कला शिक्षिका  श्रद्धा क्षीरसागर ,  रूपा खेत्रे, व इतर सहकारी शिक्षक व विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

वार्षिक स्नेहसंमेलनातच विविध पुरस्कारही जाहीर करण्यात आले त्यामध्ये पूर्व प्राथमिक विभाग –

सर्वोत्कृष्ट विद्यार्थी-

1) कुलकर्णी ईरा विजय

2) ताटे ओम सुनील

3) दुसाने दिव्या सोनल

4) कांबळे आदित्य अलोक

5) जोशी कणात प्रवीण

प्राथमिक विभाग-

सर्वोत्कृष्ट विद्यार्थी-

1) शांभवी सागर धर्माधिकारी

2) हर्ष मुऱ्हे.

4)सर्वोत्कृष्ट वर्ग- इयत्ता 4थी तुकडी क -वर्गशिक्षिका ऐश्वर्या भेगडे

1) सिनियर केजी- जयश्री चव्हाण

माध्यमिक विभाग- 1)सर्वोत्कृष्ट विद्यार्थी-कु श्रेयस गोरक्ष जांभुळकर

2) कु श्रेया वैभव देशमुख(सर्वोत्कृष्ट सांस्कृतिक विभाग)

3) सर्वोत्कृष्ट विद्यार्थी प्रतिनिधी-कु इंदिरा संतोष गुंजाळ.

4) सर्वोत्कृष्ट वर्ग (5वी ते 7वी)- इयत्ता सहावी अ वर्गशिक्षिका  अक्षता काळोखे .

5) सर्वोत्कृष्ट वर्ग ( इयत्ता 8वी ते 10वी)-वर्ग इयत्ता 8वी क , वर्गशिक्षिका सौ पद्मा नायडू .

6) प्रश्नमंजुषा स्पर्धा-यल्लो हाऊस

7) विद्यालय सांस्कृतिक विभाग चषक-येल्लो हाऊस.

ज्यू कॉलेज – सर्वोत्कृष्ट विद्यार्थी –

1) कु.चिरामल कीथ जोसी

2) कु. दाभाडे सानिका अंकुश(सर्वोत्कृष्ट सांस्कृतिक विभाग)

3) कु.दाभाडे आर्या(सर्वोत्कृष्ट विद्यार्थी प्रतिनिधी)

4) सर्वोत्कृष्ट वर्ग-११ वी सायन्स, वर्गशिक्षिका- सौ. माधवी पवार

सांस्कृतिक विभाग चषक-व प्रश्न मंजुषा चषक- टाटा हाऊस

प्रमुख पाहुणे पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक वितरणाचा समारंभ पार पडला. यावेळी प्रमुख उपस्थिती संस्थेचे अध्यक्ष  चंद्रकांतजी शेटे, उपाध्यक्ष गनिमीया सिकिलकर, सचिव  किशोर राजस, खजिनदार शिवाजीराव आगळे  संस्थेचे मान्यवर पदाधिकारी, सल्लागार डॉ. ढाकेफळकर ,  .नागुल पिल्ले , अशोक काळोखे,  सुरेश चौधरी,  सुभाष खळदे, इत्यादी उपस्थित होते तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका  नूतन कांबळे , सर्व विभाग पर्यवेक्षक  दीपक खटावकर,  सागर केंजुर, वंदना भोळे, कार्यालयीन अधीक्षक  सुजाता कुलकर्णी, सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी व पालक कार्यक्रमास उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन सोहळा याचे साक्षीदार ठरले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार  प्रियांका चौधरी यांनी केले कार्यक्रमाचे सांगता राज्य गीत व नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page