कार्यकुशल,उत्कृष्ट संघटक, कुशल नियोजक व गुणग्राहक प्रशासक ओळख असलेले मुख्याध्यापक : बाळा भेगडे

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

 

कार्यकुशल व्यक्तिमत्त्व, उत्कृष्ट संघटक, कुशल नियोजक आणि गुणग्राहक प्रशासक म्हणून ओळख असलेले ॲड. पु. वा. परांजपे विद्यामंदिरचे मुख्याध्यापक पांडुरंग रामभाऊ पोटे यांचा सेवापूर्ती शुभेच्छा समारंभ आज दिनांक १८ एप्रिल २०२६ रोजी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात विद्यालयात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे होते.

पुढे बोलताना भेगडे म्हणाले की,पोटे यांच्या कार्यकाळात विद्यालयातील भौतिक सुविधा, विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि विद्यार्थी संख्या यामध्ये झालेला लक्षणीय सकारात्मक बदल हा त्यांच्या निस्वार्थ ज्ञानसेवेची जणू पावतीच ठरली आहे. त्यांच्या कार्यातून विद्यालयाचा सर्वांगीण विकास साधला गेला असून विद्यार्थीकेंद्रित शैक्षणिक वातावरण निर्माण झाले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मावळ तालुक्याचे आमदार सुनील आण्णा शेळके,तळेगाव दाभाडे नगरीचे नगराध्यक्ष संतोष दाभाडे, संस्थेचे सचिव संतोष खांडगे, खजिनदार राजेश म्हस्के, सहसचिव विनायक अभ्यंकर, शालेय समिती अध्यक्ष चंद्रकांत शेटे,जिल्हा परिषद सदस्य पल्लवी दाभाडे, श्री.एकवीरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावले,पंचायत समितीचे गटनेते दिलीप ढोरे, पंचायत समिती सदस्य राजेंद्र कडलकअशोक काळोखे,दामोदर शिंदे,महेश शहा,सोनबा गोपाळे,नानाभाऊ नाईकोडे,प्रवीण भोसले, प्रसाद पादिर, संजय बाविस्कर, मनोज ढोरे, जयवंत कवितके, दत्तात्रय भोजने, बबनराव भसे, राजेश गायकवाड,राधिका भोंडे,माजी मुख्याध्यापिका इरावती केतकर भाऊसाहेब आगळमे ,सर्व शाळांचे मुख्याध्यापक,आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचे औक्षण व ढोल-ताशांच्या गजरात स्वागताने झाली. शालेय समितीचे अध्यक्ष चंद्रकांत शेटे यांच्या शुभहस्ते विद्यालयाच्या भव्य कमानीचे उद्घाटन करण्यात आले. सरस्वतीपूजन व दीपप्रज्वलन करून समारंभाचा श्रीगणेशा झाला. यावेळी पोटे यांच्या ३३ वर्षांच्या शैक्षणिक प्रवासाचा व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला. तसेच “आठवणींची चित्रगाथा” या विशेष दालनाचे उद्घाटन करण्यात आले. सरांच्या जीवनकार्याचा शब्दपट असलेल्या शुभेच्छा संदेश पत्रकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

Advertisement

कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक, माजी विद्यार्थी, सहकारी मुख्याध्यापक तसेच नातेवाईक यांनी मनोगत व्यक्त करताना सरांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव केला. परदेशात शिक्षण घेत असलेले सरांचे चिरंजीव सुयोग यांचे मनोगत चित्रफितीद्वारे सादर करण्यात आले.यावेळी बोलताना सरांच्या सौभाग्यवती सुनिता पांडुरंग पोटे यांनी आपल्या मनोगतातून सरांचे कुटुंबवत्सल, समाजाभिमुख आणि विद्यार्थीप्रिय व्यक्तिमत्त्व अधोरेखित केले.

यावेळी आमदार सुनील आण्णा शेळके यांनी आपल्या मनोगतात म्हटले की, “शालेय जीवनातील गुणवंत शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या जीवनाचे खरे शिल्पकार असतात. श्री पोटे सर यांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी दिलेले योगदान उल्लेखनीय असून त्यांचा कार्यकाल आदर्शवत आहे.”

बोलताना नगराध्यक्ष संतोष दाभाडे यांनी शाळा या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे केंद्र असून त्या सुसज्ज भौतिक सुविधा व गुणवत्तापूर्ण शिक्षणाने समृद्ध असाव्यात, असे मत व्यक्त केले.

यावेळी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ, मावळ तालुक्याचे आमदार, ॲड. पु. वा. परांजपे विद्यामंदिर, शिक्षक मित्रपरिवार व नातेवाईक यांच्या वतीने पोटे सरांचा विशेष सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना श्री पोटे सर यांनी भावनिक शब्दांत आपल्या शिक्षण क्षेत्रातील प्रवासाचा आढावा घेत कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी संस्थेचे सचिव म्हणाले की,पोटे सरांकडे संस्थेनी कोणतेही जबाबदारी दिली की ती प्रामाणिकपणे सुनियोजित पद्धतीने पार पाडत असत कामाविषयी प्रेम व निष्ठा ही त्यांची जमेची बाजू होती

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभा काळे व सुवर्णा काळडोके यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्येष्ठ शिक्षक संजय खराडे यांनी केले.

या सेवापूर्ती शुभेच्छा समारंभासाठी अनेक माजी शिक्षक, मुख्याध्यापक, रोटरी पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयाच्या पर्यवेक्षिका रेखा भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page