मावळमध्ये १३ फूट लांब अजगराला जीवदान; सुरक्षितपणे निसर्गाच्या सानिध्यात मुक्त
पाथरगाव मावळ : जैवविविधतेचे रक्षण करण्याच्या उद्देशाने, वाईल्डलाईफ रॅपिड रिस्पॉन्स युनिट मावळ, वडगाव मावळ वन विभाग आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्था यांच्या संयुक्त मोहिमेद्वारे एका १३ फूट लांब अजगराला यशस्वीरित्या रेस्क्यू करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. या बचाव मोहिमेत वन्यजीव रक्षक मावळ संस्था चे विशाल केदारी, अविनाश केदारी, दिनेश केदारी, नवनाथ केदारी आणि अजित नाणेकर, केतीका कसेतवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अजगराला पकडल्यानंतर जिगर सोलंकी, रौनक खरे आणि वनरक्षक महोरे यांनी त्याची प्राथमिक आरोग्य तपासणी केली. वनपरिक्षेत्र अधिकारी वडगाव प्रकाश शिंदे व वन्यजीव रक्षक मावळ संस्था चे संस्थापक निलेश गराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तपासनी करुनअजगराला कोणतीही इजा झाली नसल्याची खात्री पटल्यानंतर, त्याला सुरक्षितपणे मानवी वस्तीपासून दूर जंगलात सोडून देण्यात आले.
भारतीय अजगर हा बिनविषारी साप आहे, अजगर अत्यंत संथ असतो आणि माणसाला चावण्याची शक्यता फार कमी असते. तो आपल्या शिकाराला विष न वापरता, त्याला घट्ट वेढून घुसमटवून मारतो. त्याच्या अंगाचा रंग पांढरट-तपकिरी असून शरीरावर गडद तपकिरी डाग दिसतात. त्याचा आकारही मोठा, लांबसर आणि जाडसर असतो – अनेकदा 10 ते 15 फूटांपर्यंत वाढतो. त्याचे शिखर शेळी, ससे, भेकर, घुस व इतर प्राणी तो खातो, खाण्याच्या शोधात ते आपल्या घराजवळ किंवा शेत जवळ येतात. शेतात काम करताना आणि घरा बाहेर जाताना आपण काळजी घ्यावे.
(जिगर सोलंकी, वन्यजीव अभ्यासक)






