दक्ष नागरिक संघाच्या वतीने माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा महा मेळावा व पुरस्कार वितरण सोहळ्याचे १० मे रोजी चिंचवड येथे आयोजन

SHARE NOW

पिंपरी चिंचवड(प्रतिनिधी) :– दक्ष नागरिक संघ,पुणे जिल्हा यांच्या वतीने माहिती अधिकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांचा “माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा महा मेळावा व पुरस्कार वितरण समारंभ” रविवार, दि. १० मे २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत चैतन्य सभागृह, बिजलीनगर रोड, चिंचवड, पुणे येथे संपन्न होणार असल्याची माहिती दक्ष नागरिक संघाच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

 

प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की,प्रशासनाची जबाबदारी व नागरिकांचे अधिकार याविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात माहिती अधिकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.विविध सामाजिक, राजकीय, पत्रकारिता आणि कामगार क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमास लाभणार असून नागरिकांमध्ये या मेळाव्याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

 

माहिती अधिकार कायदा, दफ्तर दिरंगाई कायदा, सेवा हमी कायदा तसेच नागरिकांच्या दैनंदिन आयुष्यात उपयोगी पडणाऱ्या विविध कायदेशीर अधिकारांबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे. सरकारी कार्यालयांमध्ये नागरिकांना येणाऱ्या अडचणी, माहिती मिळविण्याची प्रक्रिया, अर्ज व अपील पद्धती तसेच प्रशासनाकडून होणाऱ्या विलंबावर कायदेशीर उपाययोजना या संदर्भात ॲड. अजित बोराडे हे मार्गदर्शन करणार असल्याने हा कार्यक्रम नागरिकांसाठी विशेष उपयुक्त ठरणार आहे.

Advertisement

 

 

कार्यक्रमाचे उद्घाटन मा. खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून रवी लांडगे उपस्थित राहणार आहेत. सहकारतज्ञ ॲड. अजित बोराडे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमास हाऊसिंग सोसायटी फेडेरेशन चे अध्यक्ष संजीवन सांगळे, महानगर पालिकेचे विरोधीपक्षनेते भाऊसाहेब भोईर, नगरसेवक योगेश बहल, अनिल कदम-पाटील, श्याम लांडे, जितेंद्र ननावरे, उत्तम केंदळे, राजू बनसोडे, तुषार हिंगे, निलेश तरस, सौ. सुप्रियाताई चांदगुडे, सौ. योगिताताई नागरगोजे, कामगार नेते इरफान भाई सय्यद, आझम खान, यशवंत भोसले, शांताराम कुंभार, जेष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर, सुरज साळवे , सौ. सुलभाताई उबाळे आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

 

कार्यक्रमाचे आयोजन दक्ष नागरिक संघ पुणे जिल्हा अध्यक्ष श्री. निलेश हाके यांनी केले असून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. श्वेता मांडे (वैद्य) करणार आहेत.दक्ष नागरिक संघाच्या वतीने सर्व नागरिक, माहिती अधिकार कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि तरुणांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी 7059 330 330 या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page