नवीन समर्थ विद्यालयाचा दहावीच्या निकालात शंभर टक्के यशाचा झेंडा!

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे नवीन समर्थ विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स यांनी सन 2025-26 च्या एस.एस.सी. बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.

 

यंदा परीक्षेसाठी एकूण 123 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 122 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एका विद्यार्थ्याचा विषय बदलामुळे निकाल Reserve आला आहे. संबंधित विद्यार्थी देखील उत्तम गुणांनी उत्तीर्ण होणार असल्याचा विश्वास शाळेने व्यक्त केला आहे.

 

🌟 गुणवान विद्यार्थ्यांची कामगिरी पुढीलप्रमाणे :

🥇 प्रथम क्रमांक – टिळेकर साहिल नवनाथ – 95%

Advertisement

🥈 द्वितीय क्रमांक – खोपडे आयुष वसंतराव – 93.40%

🥉 तृतीय क्रमांक – कु. पाल राज रामधारी – 93%

 

या यशामागे प्राचार्या वासंती काळोखे मॅडम व पर्यवेक्षक अर्चना शेडगे यांचे सक्षम नेतृत्व लाभले. तसेच वर्गशिक्षक अनिता आगळमे, बापूसाहेब पवार, सुनील बोरुडे व सर्व विषय शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळाले.

 

विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष संजय बाळा भेगडे, उपाध्यक्ष नंदकुमार शेलार, सचिव संतोषजी खांडगे, खजिनदार राजेश म्हस्के, सहसचिव विनायक अभ्यंकर, संचालक मंडळ, सल्लागार समिती, शालेय समिती व पालकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page