स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांची पोलिस स्टेशन,पोस्ट आॕफिस,बॕक यांना शैक्षणिक क्षेत्रभेट

SHARE NOW

तळेगाव दाभाडे

 

श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी शुक्रवार , दिनांक- 26/12/25 रोजी शैक्षणिक दृष्ट्या उपयुक्त अशा क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून विविध शासकीय व आर्थिक संस्थांचे कामकाज समजावून देणे हा होता.

या क्षेत्रभेटीत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी पोलीस स्टेशन येथे भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांना पोलिसांचे दैनंदिन कार्य, कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी, तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली.

इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी पोस्ट ऑफिसला भेट देत टपाल सेवा, पत्रव्यवहार, बचत योजना व पोस्टाच्या विविध सेवांची प्रत्यक्ष माहिती घेतली.

Advertisement

तसेच इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी बँकला भेट देऊन बँकेचे कामकाज, खात्यांचे प्रकार, बचत, कर्जप्रक्रिया व डिजिटल व्यवहार याबाबत मार्गदर्शन मिळवले.

या सर्व क्षेत्रभेटींमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील संकल्पना प्रत्यक्ष जीवनाशी जोडण्याची संधी मिळाली. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून त्यांनी आपली जिज्ञासा व्यक्त केली.अशा उपयुक्त शैक्षणिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडून येतो.

या संपूर्ण शैक्षणिक क्षेत्रभेटीचे आयोजन व नियोजन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रेणू शर्मा तसेच पर्यवेक्षक श्री. सिद्धेश्वर सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री संतोष खांडगे , संस्थेचे उपाध्यक्ष दादासाहेब उऱ्हे ,शालेय समिती अध्यक्षा सौ रजनीगंधा खांडगे , कार्याध्यक्ष श्री बाळासाहेब शिंदे , सचिव श्री मिलिंद शेलार यांनी उपक्रमाचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page