श्री धनंजय वाडेकर यांची बिनविरोध निवड.
तळेगाव दाभाडे
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या सन २०२६ ते ३० या कालावधीसाठी तळेगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते धनंजय वाडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था ही शैक्षणिक क्षेत्रातील एक अग्रगण्य नामांकित आहे.
७७ युनिट असलेल्या या संस्थेत साधारण पणे ३५००० विद्यार्थीनी शिक्षण घेत आहेत
लहान पणा पासून संघ स्वयंसेवक गटनायक ते जिल्हा व्यवस्था प्रमुख अशी जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे.
स्वा सावरकर प्रतिष्ठान संस्थापक सदस्य ते अध्यक्ष, स्वा सावरकर गुरूकुला ची स्थापना व गेली 10 वर्षे आश्रम शाळा कामशेट येथे शाला समिती सदस्य म्हणुन कार्यरत असून अनेक सामाजिक, शैक्षिणक गुणवत्ता वाढी साठी उपक्रम तसेच मुलांना व त्यांच्या पालकांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले.विविध उपक्रमातून आदिवासी संस्कृती जपण्यासाठी प्रयत्न केले.
तळेगाव शहरातील अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध असून त्यांच्या निवडीचे तळेगाव शहरांमध्ये स्वागत करण्यात येत आहे.






