रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे यांचा पर्यावरणपूरक सत्कार

SHARE NOW

तळेगाव दाभाडे

 

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमध्ये नवनिर्वाचित मुख्याधिकारी, नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांचा

रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे यांच्या वतीने

तुळस रोप व पर्यावरणपूरक कापडी पिशवी देऊन अभिनंदन व सत्कार करण्यात आला.

या उपक्रमातून पर्यावरण संरक्षण, हरित तळेगाव आणि शाश्वत विकास यांचा संदेश देण्यात आला.

यावेळी बोलताना रोटरी क्लबच्या वतीने सांगण्यात आले की,

येणारा काळ तळेगावकरांसाठी केवळ “गोल्डन सुवर्ण भविष्याचा” ठरावा,

Advertisement

हीच सर्वांची सामूहिक भावना आहे.

या प्रसंगी

रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडेचे अध्यक्ष रो. संतोष परदेशी,उपाध्यक्ष रो. प्रशांत ताए,सचिव रो. प्रदीप टेकवडे,ॲडमिन रो. बसप्पा भंडारी,रो. दिनेश चिखले,रो. अमेय झेंड तसेच क्लबचे इतर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी रोटरी क्लबच्या या उपक्रमाचे कौतुक करत,

नगरपरिषद व सामाजिक संस्थांच्या सहकार्याने

तळेगाव दाभाडे शहराच्या विकासासाठी सर्वसमावेशक व पर्यावरणपूरक कामे करण्याचा संकल्प व्यक्त केला.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page