किड्स फन टाऊन प्री-स्कूल स्नेहसंमेलन उत्साहात
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे येथील किड्स फन टाऊन प्रि-स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात सुशीला मंगल कार्यालय येथे पार पडले. प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलेले स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूलचा श्रीमती रजनीगंधा खांडगे, प्रसिद्ध कीर्तनकार जयश्री ताई येवले तसेच विशेष आमंत्रित केलेल्या प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर रेणुका पाटील पारवे, मास्टरमाईंड अकॅडमीचा संचालिका श्रीमती शुभांगी करले आणि मान्यवर पाहुणे म्हणून आमंत्रित केलेल्या राष्ट्रवादि महीला आघाडी, वडगांव मावळच्या अध्यक्षा पद्मावती ढोरे, अजित फाउंडेशन चा अध्यक्षा विनाया निंबाळकर, महीला आघाडी तळेगाव दाभाडे अध्यक्षा निर्मला ताई पोटे, माउंट सेंटेन्स स्कूल च्या शिक्षिका स्नेहल बेलेकर तसेच शाळेचे संस्थापक नितीन फाकटकर हे मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य वैशाली फाकटकर यांचा मार्गदर्शना खाली करण्यात आले. “भारतीय सण” ही थीम ठेवून नाटक आणि नृत्य करून चिमुकल्यांनी उपस्थितांचे मन जिंकले. उपस्थित मान्यवरांनी शाळेचे व विद्यार्थ्यांचे कौतुक करत या कार्यक्रमाची प्रशंसा केली.