*कृष्णराव भेगडे स्कूल मध्ये मुलींनी मारली बाजी*
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे येथील कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलने यावर्षीही शंभर टक्के निकालाची परंपरा राखत यश संपादन केले असून मुलींनी बाजी मारली आहे. संस्थेचे अध्यक्ष संदीप काकडे, संस्थापक चंद्रकांत काकडे, संचालिका गौरी काकडे, खजिनदार अनिल तानकर आणि शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती सावंत,पर्यवेक्षक, शिक्षक शिक्षेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.प्रथम तीन क्रमांक आलेले विद्यार्थी खालील प्रमाणे
प्रथम क्रमांक -श्रेया झावरे ९७.८०टक्के
द्वितीय क्रमांक- प्रांजली मालठाणे ९७.२०टक्के
तृतीय क्रमांक- आर्या शिंदे ९६.६०टक्के.तसेच प्रथम आलेले तीन क्रमांक सोडून ९० टक्यांपेक्षा अधिक मार्क मिळवून यशस्वी झालेले १०विद्यार्थी आहेत.