सरस्वती विद्यामंदिर ची 100% निकालाची परंपरा कायम

तळेगाव दाभाडे :

Advertisement

सरस्वती विद्यामंदिर तळेगाव दाभाडे येथील इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून सातत्याने शाळेचा निकाल शंभर टक्के लागत आहे. सन 2023- 24 या शैक्षणिक वर्षात 88 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत सहभागी झाले असून 88 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. 90% च्या वर एकूण 19 विद्यार्थी असून विश्वजीत विष्णू गावडे या विद्यार्थ्यास संस्कृत मध्ये 100 पैकी 100 गुण मिळाले आहेत. शाळेत विश्वजीत विष्णू गावडे 97.60% गुण मिळवून प्रथम आला आहे व मावळ तालुक्यात तृतीय आहे. कुमारी श्रद्धा मुकुंद इंगळे 96.80 % गुण मिळवून शाळेत द्वितीय आली आहे तर कुमारी क्षीरसागर समीक्षा शरद ही विद्यार्थिनी 96 टक्के गुण मिळवून शाळेत तिसरी आली आहे. विशेष योग्यता मध्ये 48 विद्यार्थी असून ए श्रेणीत 31 व बी श्रेणीत 9 विद्यार्थी आहेत .शाळेच्या या उज्वल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष  सुरेश झेंड ,उपाध्यक्ष  दिलीप कुलकर्णी, कार्यवाह प्रमोद देशक,खजिनदार सुचित्राताई चौधरी,अंमलबजावणी अधिकारी  अनंत भोपळे ,शिक्षण मंडळ सदस्य डॉक्टर ज्योती चोळकर, सदस्य  विश्वास देशपांडे , सुनील आगळे व माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका रेखा परदेशी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक नवनाथ गाढवे यांनी सर्व विद्यार्थी, पालक सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page