*तळेगाव नगर परिषद विद्यालयात विजय लोहगावकर प्रथम*
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या माध्यमिक विद्यालय क्र.६चा यावर्षीचा दहावीचा निकाल ९३.२४ टक्के लागला आहे. अनुक्रमे प्रथम क्र.- विजय लोहगावकर ९१.४१टक्के, द्वितीय क्र.अनुष्का डामसे ८५.६०टक्के, तृतीय क्र.- रेणू चव्हाण ८४टक्के गुण प्राप्त करून उत्तीर्ण झाले.तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारीविजयकुमार सरनाईक, उपमुख्याधिकारी ममता राठोड, प्रशासन अधिकारी शिल्पा रोडगे, मुख्याध्यापिका वसुंधरा माळवदकर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.