*परम कुंभार सरस्वती शाळेत प्रथम आणि मावळात द्वितीय*
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे येथील सरस्वती विद्यामंदिरचा दहावीचाचा निकाल शंभर टक्के लागला असून ५७ विद्यार्थ्यांना विशेष योग्यता मिळाली आहे.अ श्रेणीमध्ये १९ ,ब श्रेणीत १० व क श्रेणीमध्ये एक विद्यार्थी आहे. ९० टक्के च्या वर गुण अठरा विद्यार्थ्यांना मिळाले आहेत. परम कुंभार हा विद्यार्थी ९७.८० टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम आणि मराठी माध्यमात मावळ तालुक्यात द्वीतीय आला आहे. स्वरांगी अमित चाफेकर ही विद्यार्थिनी ९६ टक्के गुण मिळवून शाळेत दुसरी आली आहे तर समीक्षा बिराजदार आणि
श्रेया टेकवडे या विद्यार्थिनी ९५.४० टक्के गुण मिळवून शाळेत तिसऱ्या आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या उज्वल यशाबद्दल विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि मुख्याध्यापिका रेखा परदेशी यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष सुरेश झेंड, उपाध्यक्ष दिलीप कुलकर्णी, कार्यवाह प्रमोद देशक, अनंत भोपळे, खजिनदार सुचित्रा चौधरी ,सदस्य सुनील आगळे, विश्वास देशपांडे आदींनी केले आहे.