उत्कर्ष शाळेच्या संस्थापक व प्रशासना विरोधात आंदोलन.. महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ पुणे जिल्हा यांच्या वतीने साखळी उपोषण व घंटानाद आंदोलन सुरू. शिक्षकांना जनावराप्रमाणे वागणूक देणाऱ्या शिक्षण संस्थेवर कारवाई करा..
पुणे
महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ पुणे जिल्हा यांच्या वतीने उत्कर्ष प्राथमिक विद्यालय आंबेगाव येथील संस्था व मुख्याध्यापकांच्या मनमानी कारभाराविरोधात घंटानात आंदोलन व साखळी उपोषण सुरू आहे.
यावेळी घंटानात आंदोलन व साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.
शिक्षकांना जनावराप्रमाणे वागणूक देणाऱ्या शिक्षण संस्थापकावर व मुख्याध्यापक यावर तात्काळ गुन्हे दाखल करावे.
मुख्याध्यापकांची बनावट मान्यता तात्काळ रद्द करावी. व शिक्षणाच्या नावाखाली दुकानदारी करणाऱ्या संस्थापकांचा काळाबाजार तात्काळ थांबवावा.
पवित्र शिक्षण क्षेत्राच्या नावाखाली होणारी अरेरावी दडपशाही गुंडगिरी बंद करावी. शिक्षकांना शालेय वेळेपेक्षा जास्त वेळ काम करायला लावणाऱ्या संस्थापक व मुख्याध्यापकावर तात्काळ कार्यवाही करावी.
उत्कर्ष प्राथमिक विद्यालय संस्था व मुख्याध्यापकांच्या मनमानी कारभाराविरोधात घंटानात आंदोलन व साखळी उपोषण सुरू असून आंदोलन जोरात सुरू आहे .
या वेळी उपस्थित आंदोलकांनी मागण्या केल्या की,
शिक्षकांचा मागील वेतन फरक शासन निर्णयानुसार मिळावा.
शिक्षकांकडून घेतलेले 50 हजार रुपये व त्यांचे सेवा पुस्तक त्यांना देण्यात यावे.
शासन नियमानुसार विद्यार्थ्यांची फी आकारण्यात यावी.
अतिरिक्त वाढीव फी घेणाऱ्या संस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात यावा.
मुख्याध्यापकांची बोगस मान्यता रद्द करावी.
संस्थापक, सचिव, संचालक आणि त्यांचे नातेवाईक यांच्याकडून शिक्षकांवर होणाऱ्या शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रासातून त्यांची मुक्तता करण्यात यावी..
संस्थेचा कारभार पाहण्यासाठी प्रशासनाची नेमणूक तात्काळ करावी.
अशा विविध मागण्यांसह घंटानाद आंदोलन व साखळी उपोषण सुरू असून जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी व शिक्षण मंडळ शिक्षण प्रमुख यांनी याची तात्काळ दखल घ्यावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ पुणे जिल्हा शाखा यांच्या वतीने देण्यात आली.
यावेळी बोलताना संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष नारायण शिंदे यांनी सांगितले की संस्थेचा शिक्षकांवर अतिरिक्त ताण तणाव यामुळे शिक्षकांचे मनोबल खचलेले आहे. पुण्यात अनेक शिक्षण संस्थापक आपली दुकानं थाटून दुकानदारी करत आहेत. शिक्षकांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराविरोधात संघटना यापुढील काळात अधिक आक्रमक होऊन काम करणार आहे. जर शिक्षकांवर अन्याय अत्याचार होत असेल तर त्यांनी संघटनेकडे तसे तात्काळ लेखी कळवावे त्या विरोधात संघटना नक्किच आक्रमक पवित्रा नक्कीच घेईल.
काही संस्थापक हे शिक्षकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न करत आहेत यासाठी देखील शिक्षकांच्या पाठीमागे शिक्षक संघटना खंबीरपणे उभा राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.