तळेगाव दाभाडे मधील वीर जिजामाता प्राथमिक कन्या शाळा क्रमांक पाच मध्ये पालखी सोहळा
तळेगाव दाभाडे :
तळेगाव मधील शाळा क्रमांक पाच कन्या शाळेत पालखी सोहळा. तळेगाव दाभाडे दिनांक 15 जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त सुरू असलेल्या पंढरपूर वारीच्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे येथील वीर जिजामाता प्राथमिक कन्या शाळा क्रमांक पाच कडून पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. नगरपरिषदेच्या शिक्षण समितीच्या प्रशासन अधिकारी शिल्पा रोडगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थिनी सहभागी झाल्या. श्री विठ्ठल व रुक्मिणीच्या वेशभूषेसह वारकऱ्यांचा पेहराव करून पालखी टाळ मृदुंग विणेच्या समवेत अखंड हरिनामाचा गजर करत मारुती चौकामधील निळकंठ नगर येथील मंदिरात पालखी नेण्यात आली यावेळी मुख्याध्यापिकादांगट मॅडम व समस्त शिक्षक वृंद सहभागी झाले विठ्ठल मंदिरातील श्री. माने यांनी केळी स्वरूपात प्रसादाचे वाटप केले. मंदिरातील सेविकांनी विविध अभंग म्हटले त्या समवेत मुलींनीही अभंगाचा आनंद घेतला विद्यार्थिनींनी शाळेच्या मैदानावर रिंगण करून फुगड्या घातल्या. विविध वारकरी सांप्रदायिक खेळ खेळून आनंद द्विगुणीत केला.