जबरी चोरी करणा-या सराईतास कोंढवा तपास पथकाकडुन अटक… कौशल्यपुर्ण तपासाअंती ४ गुन्हे उघड…
कोंढवा पुणे :
कोंढवा भागात राहणारी महिला कल्पना विठ्ठल पाटील, वय ३९ वर्षे, धंदा व्यवसाय, रा. गल्ली नं १२, महालक्ष्मी मंदिराजवळ, भगवा चौक, शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द, पुणे यांच्या स्टार सेल्स, नावाचे शॉप भाग्योदयनगर, जामा मस्जिद जवळ, कोंढवा खुर्द, पुणे येथील दुकानातुन चोरटय़ाने गल्ल्यातील ३ हजार रुपये रोख रक्कम चोरी गेल्याबाबत कोंढवा पोलीस ठाणे पुणे येथे गुन्हा दाखल आहे. सदर आरोपी यांचा शोध घेण्याबाबत मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस निरीक्षक गुन्हे यांनी तपास करून कार्यवाही सुरू केली . सदर गुन्ह्यात सहा. पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे व त्याचे तपास पथकातील पोलीस अंमलदार पो. हवा. अमोल हिरवे, पो.शि. विकास मरगळे, पो.शि. अक्षय शेंडगे, पो.शि. अभिजीत रत्नपारखी, पो.शि. राहुल थोरात, पो. शि. सुहास मोरे, पो. शि. अभिजीत जाधव, पो. शि. गणेश चिंचकर, पो. शि. राहुल रासगे असे पेट्रोलिंग करुन सदरच्या घटनास्थळाच्या आजुबाजुला असणा-या सीसटिव्हि फुटेजच्या माध्यमातुन तसेच गुप्त बातमीदारामार्फतीने माहिती घेतली. तपासातील कार्यवाही सुरू असताना गुप्तहेराच्या माहितीनुसार शितल पेट्रोल पंपाच्या जवळ आरोपी असल्याची माहिती मिळाली. *पोलीस अंमलदार विकास मरगळे, पो. अ. अक्षय शेंडगे यांना त्याच्या* बातमीदारामार्फतीने बातमी प्राप्त झाली की, सदर गुन्हा हा आरोपी नामे कदिर उर्फ काजु आरिफ अन्सारी, वय २१ वर्षे, रा. भाग्योदयनगर ग.न.०२, बुशरा अर्पा. फलॅट नं.१३, कोंढवा खु पुणे याने केला असल्याची व त्याच्याकडे आणखी काही चोरीचे मोबाईल असुन ते विकत घेण्यासाठी तो ग्राहक शोधत आहे, अशी माहिती मिळाली तसेच सदर माहितीच्या अनुषंगाने आरोपी यांची माहिती घेवुन त्याचा शोध घेऊन तो स.न.४२ मधील अजमेरा पार्क येथील चहाच्या टपरीवर चहा व सिंगारेट पिण्यासाठी सायंकाळच्या सुमारास येत असतो अशी माहिती प्राप्त झाली. तेव्हा सदर ठिकाणी वरिल स्टाफच्या मदतीने सापळा रचुन आरोपी अजमेरा पार्क सोसायटीत आल्याचे दिसले. तेव्हा त्यास सोबतच्या स्टाफसह पंचाच्या समक्ष ताब्यात घेवुन त्याचे नाव पत्ता विचारता त्याने वरिलप्रमाणे आपले नाव पत्ता सांगितले. त्यावेळी त्याची पंचाच्या समक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या खिशात एकुण चार मोबाईल, एक विवो कंपनीचा, एक ओपो कंपनीचा, एक मोटोरोला कंपनीचे, तसेच पॅन्टच्या चोर खिशात रोख रक्कम ३०००/- रु मिळुन आली. त्यावेळी त्याच्याकडे सदर मोबाईलबाबत तसेच रोख रक्कमेबाबत तपास केला असता त्याने कोंढवा भागातील १) शिवनेरीनगर ग.न.२३, शंगुनका हाईट्स, कोंढवा खुा पुणे, २) लेडी हलीमा शाळेच्या बाहेर कोंढवा खुाा पुणे, ३) नवाजिश चौक, रुकसार हाइट्स ग.न.५१, शबाना शेख यांच्या रुममध्ये भाडयाने, हयात हॉटेल जवळ, कोंढवा खु पुणे येथील उघडया दरवाजातुन घरातील लोकाची नजर चुकवून मोबाईल चोरी केली केल्याची कबुली दिली. तसेच रोख रक्कम ही स्टार सेल्स, नावाचे शॉप भाग्योदयनगर , येथुन चोरी केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपी
यांच्या विरुध्द यापुर्वी ही तीन मारहाण केल्याचे गुन्हे दाखल असुन सदर आरोपी यांच्याकडुन १ जबरी चोरीचा व ३ मोबाईल चोरीचे पुढीलप्रमाणे गुन्हे केल्याचे उघड झाले आहे.
१) कोंढवा पोलीस ठाणे पुणे येथे गुरन.८३१/२०२४, भा.न्या.सं.अधि. २०२३ चे कलम ३०९ (४)
२) कोंढवा पोलीस ठाणे पुणे येथे गुरन. ८४८/२०२४ भा.न्या.सं.अधि. २०२३ चे कलम. ३०३ (२)
३) कोंढवा पोलीस ठाणे पुणे येथे गुरन. ८४०/२०२४ भा.न्या.सं.अधि. २०२३ चे कलम, ३०३ (२)
४) कोंढवा पोलीस ठाणे पुणे येथे गुरन. ८४६/२०२४ भा. न्या.सं.अधि. २०२३ चे कलम ३०३ (२) वरिलप्रमाणे कामगिरी मा. अमितेशकुमार साो पोलीस आयुक्त, मा. मनोज पाटील साो, अपर पोलीस आयुक्त, पुर्वे
प्रादेशिक विभाग, मा.आर राजा, पोलीस उप आयुक्त साो परि.०५, मा. नंदकुमार गोडसे, सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, संतोष सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीमती रुणाल मुल्ला व मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, पोलीस उप निरीक्षक बालाजी डिगोळे, अंमलदार पो. हवा. अमोल हिरवे, पो. शि. विकास मरगळे, पो. शि. अक्षय शेंडगे, पो.शि. अभिजीत रत्नपारखी, पो.शि. राहुल थोरात, पो.शि. सुहास मोरे, पो.शि. अभिजीत जाधव, पो. शि. गणेश चिंचकर, पो. शि. राहुल रासगे यांनी केली आहे.