‘इंद्रायणी’त रंगली अभंग वारी

तळेगाव दाभाडे (दि. २० जुलै):

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या इंद्रायणी महाविद्यालयाचा मराठी विभाग व तळेगाव दाभाडे येथील आवर्तन या संस्थांच्या माध्यमातून इंद्रायणी महाविद्यालयामध्ये अभंगवारीचे आयोजन करण्यात आले होते.

संस्थेचे अध्यक्ष व सुप्रसिद्ध उद्योजक श्री. रामदास काकडे यांच्या उपक्रमशील विचारातून पुढे आलेले या संकल्पनेला प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी पालखीची परिक्रमा आयोजित करुन उस्फूर्त प्रतिसाद दिला. इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या कांतीलाल शहा विद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह श्री. चंद्रकांत शेटे, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, बी. फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय आरोटे, डी . फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.गुलाब शिंदे, उपप्राचार्य एस. पी. भोसले, गोरख काकडे तसेच सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

पंडित विनोदभूषण अल्पे, धनश्री शिंदे व डॉ. प्राची पांडे या गायकांच्या साथीला मंगेश राजहंस, अनिरुद्ध जोशी, प्रिया करंदीकर, योगीराज राजहंस या वादक कलाकारांनी साथ संगत केली व अभंगांचा जागर इंद्रायणी महाविद्यालयात घुमला. अभंगांचे निरूपण सुप्रसिद्ध निवेदक विराज सवाई यांनी केले.

 

 

इंद्रायणी काठी देवाची आळंदी, अरे अरे ज्ञाना झालासी पावन, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, ज्ञानीयांचा राजा गुरु महाराव, खेळ मांडियेला वाळवंटी ठायी रे अशा नानाविध संतांच्या रचनांनी वातावरण भक्ती माय केले तसेच विराज सवाई यांच्या अभ्यासपूर्ण अभंग निरूपणाने कार्यक्रमाला एक वेगळीच उंची प्राप्त झाली. पंडित विनोद भूषण अल्पे यांच्या ‘बाजे रे मुरलीया बाजे’ या भैरवीने कार्यक्रमाची भावपूर्ण वातावरणात सांगत झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page