इंटरॅक्ट क्लबच्या माध्यमातून नेतृत्वगुण सामाजिक जाणीव आणि सेवाभावी वृत्ती विकसित करण्यास मदत- रो मिलिंद शेलार
तळेगाव दाभाडे :
रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी अंतर्गत ॲड. पु.वा. परांजपे विद्यामंदिर तळेगाव दाभाडे येथील विद्यालयात इंटरॅक्ट क्लब स्थापन करण्यात आला असून त्याचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
इंटरॅक्ट क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण सामाजिक जाणीव आणि सेवाभावी वृत्ती विकसित करण्यास मदत होणार आहे. हा क्लब विविध सामाजिक उपक्रम पर्यावरण संवर्धन, आरोग्य, विषयक कार्यक्रम आणि शैक्षणिक उपक्रम राबवणार आहे. असे मत रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे अध्यक्ष मिलिंद शेलार यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. या रोटरी क्लब ऑफ तळेगांव एमआयडीसीचे संस्थापक अध्यक्ष रो. संतोष खांडगे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. याप्रसंगी रोटरी क्लब तळेगाव एमआयडीसीचे खजिनदार रो. पांडुरंग पोटे तसेच रो. जगन्नाथ काळे तसेच विद्यालयातील शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.