*पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या सचिवपदी संतोष भेगडे यांची बिनविरोध निवड.*
तळेगाव दाभाडे :
पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या सचिवपदी संतोष मारूती भेगडे (Santosh Bhegade) यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक प्रक्रिया पुण्यात शिवाजीनगर येथील फेडरेशनच्या मुख्य कार्यालयात पार पडली.
फेडरेशनच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव या पदांसाठी निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) बी. एल. साबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सकाळी ११ वाजता निवडणुकीची सुरुवात झाली. नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यापासून ते मतमोजणीपर्यंत सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर संतोष भेगडे यांची सचिवपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
फेडरेशनचे नवीन पदाधिकारी व संचालक पुढीलप्रमाणे
फेडरेशनच्या संचालक मंडळाच्या सभेला खालील पदाधिकारी व संचालक उपस्थित होते:
अध्यक्षा – रेश्मा अनिल भोसले
उपाध्यक्ष – शामराव किसन हुलावळे
सचिव – संतोष मारूती भेगडे (Santosh Bhegade)
संचालक – संतोष गोपाळराव पाटील, रमेश लक्ष्मण भुजबळ, नंदकुमार गंगाधर गायकवाड, प्रवीण रामचंद्र ढमाळ, दिलीप तुकाराम वेडेपाटील, नितीन गुलाबराव गोरे, जयवर्धन अनिल भोसले, आदित्यसिंह अविनाश घोलप, मंदाकिनी शहाजी चव्हाण, विनायक गुलाबराव तांबे, यतीन कुमार गोविंद हुले, नानासाहेब दाजीराम मोकाशी, माणिकराव महादेव झेंडे, अमृता स्वप्निल रानवडे, वंदना प्रशांत काळभोर, दीपक उत्तम जवंजाळ, तानाजी शंकर लवटे, नितीन शरदचंद्र पाटील (मुख्य कार्यकारी अधिकारी), सुदाम एन तांदळे (सहाय्यक निबंधक).