*श्री सुर्यमुखी गणेश मंदिराचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा*
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे स्टेशन भागातील आनंदनगर येथील श्री सुर्यमुखी गणेश मंदिराचा वर्धापन दिन रविवारी(दि.०९)भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.या निमित्त धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी अथर्वशीर्ष पठण,श्री गणेश सत्यविनायक महापूजा दुपारी श्री गणेश पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली.मिरवणूकी मध्ये पारंपरिक वाद्य होते.मिरवणूक मार्गावर आकर्षक रांगोळी काढून परिसर सुशोभित करण्यात आलेला होता.मिरवणूकीस भाविकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. सायंकाळचे सुमारास सामाजिक कार्यकर्ते रामदास काकडे आणि माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे यांचे हस्ते महाआरती करण्यात आली.यावेळी गणपती बाप्पा!मोरय्या!असा गजर होत होता.यावेळी अध्यक्ष श्रीमंत रोडे,सचिवआबासाहेब आळगड्डे,खजिनदार सतीश लोखंडे,दशरथ पुजारी,रेश्मा फडतरे,गणेश बाबर,वसंत पवार,राजेंद्र दहितुले उपस्थित होते.सुत्रसंचालन शिवाजी वाळुंज यांनी केले.रात्री महाप्रसादाचे आणि भजनाचे आयोजन करण्यात आले होते त्याचा परिसरातील भाविकांनी लाभ घेतला.