तळेगाव दाभाडे शहरातील विविध नागरी समस्या बाबतीत जागृरुक वाचक कट्ट्यातर्फे मुख्याधिकारी एन के पाटील यांना निवेदन देण्यात आले.
तळेगाव दाभाडे शहरातील विविध नागरी समस्या बाबतीत जागृरुक वाचक कट्ट्यातर्फे मुख्याधिकारी मा. श्री एन के पाटील यांना दिनांक 4 मार्च रोजी निवेदन देण्यात आले. निवेदन देताना तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष ,आरोग्य सभापती ,पाणीपुरवठा समितीचे सभापती किशोर भाऊ भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक अरुण माने,सामाजिक कार्यकर्ते प्रमोद देशक, दिलीप डोळस, राजेश बारणे, प्रकाश दातार, निरंजन जहागीरदार आदी सदस्य उपस्थित होते.
मुख्याधिकारी साहेबांनी सर्व विभागातील अधिकाऱ्यांना प्रत्येक समस्या बाबतीत चर्चा करून योग्य त्या सूचना देऊन त्वरित कार्यवाही आणि कारवाई करण्याचे आदेश दिले. सर्व समस्या निवारणासाठी मुख्याधिकारी सकारात्मक असून नागरिकांसाठी मी केव्हाही उपलब्ध असून शहराच्या विकासासाठी शासनाच्या वतीने मी पुरेपुर प्रयत्न मी करेन फक्त नागरिक आणि माजी नगरसेवक मान्यवरांनी मला सहकार्य करावे आपण मिळून तळेगांव दाभाडे शहर *सुंदर तळेगांव हरित तळेगांव स्वच्छ तळेगांव* ही किशोरभाऊ भेगडे यांची संकल्पना आपण सर्वजण मिळून प्रत्यक्षात आणू अशी ग्वाही दिली .
खेळीमेळीच्या वातावरणात अडीच तास झालेल्या चर्चेतून सखोल माहिती घेऊन शहरात बदल होईल आणि आपले तळेगांव दाभाडे शहर पुन्हा जगाच्या नकाशावर स्वच्छ शहर म्हणून उदयास येईल.