काळोखेपाटील मळा येथे काकडा आरती सांगता सोहळ्या निमित्ताने ह भ प नाना महाराज काळोखे यांचे काल्याचे कीर्तन संपन्न..

SHARE NOW

देहू  – देहू गावातील काळोखे मळा या ठिकाणी सालाबाद प्रमाणे कोजागिरी पौर्णिमेपासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत दररोज सकाळी साडेचार ते सात वाजेपर्यंत काकडा आरती असते, संपूर्ण महिनाभर या काकडा आरती ने दिवसाची सुरुवात होत असते, या दरम्यान सात दिवस गाथा पारायण आणि तीन दिवस कीर्तन सोहळा श्री विठ्ठल मंदिर काळोखेपाटील मळा येथे साजरा केला जातो..ह भ प कुणाल महाराज जाधव आणि हभप संगीताताई भालेकर यांनी दोन दिवस कीर्तन सेवा दिली.हभप नाना महाराज काळोखे यांनी आपल्या ओजस्व वाणीने काल्याच्या कीर्तनात सांगितले की, वारकरी संप्रदायात श्रीकृष्णाने यमुनेच्या वाळवंटामध्ये गोपाळंबरोबर जो काला केला .अगदी तसाच्या तसा काला वारकरी सप्ताह मध्ये केला जातो . वै. हभप सखाराम कोंडीबा काळोखे पाटील यांनी सुरू केलेली काकडा आरती सोहळा, ही परंपरा पुढे नेण्याचे कार्य अशोक रामचंद्र काळोखे ज्ञानेश्वर कृष्णाजी काळोखे यांच्या पुढाकाराने गेली सहा वर्षे सुरू आहे.आज ह भ प नाना महाराज काळोखे यांचे काल्याच्या किर्तननाने व महाप्रसादाने सांगता झाली .प्रसंगी परिसरातील भाविक भक्तानी महिला परुषानी गाथा पारायनाचा व किर्तन श्रवनाचा लाभ घेतला.. सदर कार्यक्रमाचे संयोजन अशोक रामचंद्र काळोखे, ज्ञानेश्वर कृष्णाजी काळोखे, अशोक मारूती काळोखे यांनी केले होते… जगद्गुरु भजनी मंडळ,जगद्गुरु मित्र मंडळ आणि समस्त काळोखेपाटील मळा, यांनी मोलाची साथ दिली.या प्रसंगी देहु शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विवेक वसंत काळोखे अध्यक्ष, सहायक पोलीस निरीक्षक, संत तुकाराम साखर कारखान्याचे वरिष्ठ अधिकारी,मोहन तुकाराम काळोखे, ज्येष्ठ नेते आणि समाजसेवक शशिकांत हरिभाऊ काळोखे, दिलीप चंद्रकांत काळोखे, मारूती शंकर काळोखे युवा उदोजक भरत शांताराम काळोखे आदिच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page